---Advertisement---

IND Vs ENG : रोहित शर्माने कसोटीत केला खास विक्रम, धोनीलाही टाकले मागे

---Advertisement---

आज इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत रोहित शर्माने पहिल्या दिवशी राजकोटमध्ये टीम इंडियाच अडचणीत असताना झुंजार शतक ठोकलं आहे. तसेच रोहितने खऱ्या अर्थाने कॅप्टन्सी इनिंग खेळली आहे. टॉस जिंकून बॅटिंगला आलेल्या टीम इंडियाने झटपट 3 विकेट्स गमावल्या होत्या. मात्र त्यानंतर रोहितला रवींद्र जडेजा याने चांगली साथ दिली. तर दोघांनी एकेरी-दुहेरी धाव घेत धावफलक हलता ठेवला होता. तसेच संधी मिळाली तेव्हा मोठे फटके मारले. अशाप्रकारे दोघांनी शतकी भागीदारीही केली. त्यानंतर टी ब्रेकनंततर रोहितने शतक केलं आहे.

याबरोबरच रोहित शर्माने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 11 वं शतक 158 चेंडूत पूर्ण केले आहे. तर या शतकीय खेळीत 11 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत. रोहित शर्माचे राजकोट मैदानावरील हे पहिले कसोटी शतक आहे. तर इंग्लंडविरुद्धचे हे तिसरे कसोटी शतक आहे. तसेच कर्णधार रोहित शर्माने राजकोट कसोटीच्या पहिल्या डावात 2 षटकार ठोकताच एक मोठा विक्रम केला. कसोटी फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्माने आता एमएस धोनीला मागे टाकले आहे.

https://twitter.com/BCCI/status/1758058652382941188

तसेच, कसोटी फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर रोहित शर्मापूर्वी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी दुसऱ्या क्रमांकावर होता. आता तो तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. ज्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 78 षटकार ठोकले होते.

तर रोहित शर्माने आतापर्यंत ७९ कसोटी षटकार मारले आहेत. त्याचबरोबर भारताकडून कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. सेहवागने टेस्टमध्ये 91 षटकार मारले होते. रोहित शर्मा असाच कसोटीत खेळत राहिला तर तो या विक्रमात सेहवागला नक्कीच मागे टाकेल.

दरम्यान, रोहित शर्माचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे 47 वे शतक आहे. तसेच सध्यांच्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक 80 शतके, तर डेव्हिड वॉर्नरच्या नावावर 49 शतकं आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---