भारत आणि इंग्लंडमधील चौथ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून भारतीय संघाने 192 धावांचा पाठलाग करताना दिवसाचा खेळ संपेपर्यंत बिनबाद 40 धावा केल्या आहेत. कॅप्टन रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल ही सलामी जोडी नाबाद 24 आणि 16 धावा करुन परतले आहेत. त्यामुळे भारतीय संघाला चौथ्या दिवशी विजयासाठी आणखी 152 धावांची गरज आहे. तसेच टीम इंडियाला सामन्यासह मालिका जिंकण्याची संधी देखील आहे.
अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये रोहित शर्माने सर्फराज खानला झापलं आहे. इंग्लंडचा संघ फलंदाजी करत असताना टीम इंडियाने आक्रमक फिल्डिंग लावली होती. स्ट्राईकला असलेल्या खेळाडूच्या जवळ सर्फराज खान हा उभा होता. त्यावेळी त्याने हेल्मेट घातलं नव्हतं. त्यावेळी कॅप्टन रोहित शर्माने आपल्या स्टाईलमध्ये त्याला झापलेलं पाहायला मिळालं. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, रोहित सर्फराज खानला “ऐ भाई हीरो नहीं बनने का इधर”, असं बोलत आहे.
तसेच रोहितने सर्फराज खान याला झापल्यावर कॉमेट्री करणाऱ्यांनी यावर स्पष्टीकरण देताना रोहितच्या स्टाईलचं कौतुक केलं. क्रिकेटमध्ये बॉल लागल्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. रोहितने मैदानावर एक कर्णधार म्हणून त्याचं उत्तम काम पार पाडलं. सोशल मीडियावर त्याचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
🔊 Hear this! Rohit does not want Sarfaraz to be a hero?🤔#INDvsENG #IDFCFirstBankTestSeries #BazBowled #JioCinemaSports pic.twitter.com/ZtIsnEZM67
— JioCinema (@JioCinema) February 25, 2024
दरम्यान, भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी ध्रुव जुरेल याच्या 90 धावांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या डावात 307 धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघ इंग्लंडने केलेल्या 352 धावांचा टप्पा पार करण्यात अपयशी ठरली. त्यामुळे इंग्लंडला 46 धावांची आघाडी मिळाली होती. मात्र दुसऱ्या डावात इंग्लंडची आर अश्विन आणि कुलदीप यादव या दोघांच्या फिरकीसमोर काहीच चाललं नाही. इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 145 धावांवर आटोपला. त्यामुळे भारताला 192 धावांचं लक्ष मिळाले होते.
महत्वाच्या बातम्या –
- ध्रुव जुरेलने कारगिल युद्धात लढलेल्या वडिलांना केला सलाम! अन् ‘या’ दिग्गजाने केली भविष्यवाणी; म्हणाला,’हा पुढचा धोनी…
- IND vs ENG : तिसऱ्या दिवसअखेर भारत मजबूत स्थितीत, चौथ्या दिवशी सामना जिंकण्यासाठी 152 धावांची गरज