---Advertisement---

IND Vs ENG : रांची कसोटीत सारा तेंडुलकर चर्चेत, चाहत्यांनी केली घोषणाबाजी, म्हणाले, ‘सारा भाभी जैसी हो…

On: शनिवार, फेब्रुवारी 24, 2024 3:31 PM
---Advertisement---

भारतीय संघाची सुरवात चौथ्या कसोटी सामन्यात निराशाजनक सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने इंग्लंडला दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात 353 धावांवर ऑलआऊट केलं. जो रुट याने केलेल्या नाबाद 122 धावांच्या जोरावर इंग्लंडला 350 पार मजल मारता आली. तर टीम इंडियाकडून ऑलराउंडर रवींद्र जडेजाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर पदार्पणवीर आकाश दीप याने इंग्लंडला 3 झटके दिले आहेत. 

त्यानंतर इंग्लंडचं पॅकअप केल्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि कॅप्टन रोहित शर्मा ही मुंबईकर सलामी जोडी मैदानात आली. इंग्लंडच्या 353 धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाला चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र ज्याची भीती तेच झालं. रोहित पुन्हा एकदा स्वसतात आऊट झाला होता. त्यानंतर भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिल फलंदाजीसाठी मैदानात आला होता. गिल येताच चाहत्यांनी सारा तेंडुलकरच्या नावाने घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे सारा तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

अशातच गेल्या सामन्यातही गिल 91 धावा करून बाद झाला होता. मात्र रांची कसोटीत आज गिल बॅटिंगला आला तेव्हा चाहत्यांनी सारा तेंडुलकरच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. ‘आमची वहिनी कशी असावी, सारा भाभीसारखी असावी’ अशा घोषणा देत होते. तसेच शुभमन गिल बराच काळ फॉर्मात नव्हता. याबरोबरच गिलने 10 पेक्षा जास्त कसोटी डावांमध्ये एकही अर्धशतक झळकावले नव्हते. यानंतर गिलने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शानदार शतक झळकावले होते.

दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यानंतर गिल चांगली कामगिरी करत आहे. तसेच याच सामन्याच्या दुसऱ्या डावात गिलने ३४ धावांची खेळी केली होती. यानंतर गिलने राजकोट कसोटीच्या दुसऱ्या डावातही ९१ धावांची खेळी केली. अशा परिस्थितीत खराब फॉर्ममुळे गमावलेला आत्मविश्वास गिलने पुन्हा परत मिळवला आहे.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---