भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील चौथा कसोटी सामना सध्या रांची येथे खेळला जात आहे. तर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा स्टार खेळाडू सरफराज खान याने इंग्लंडचा खेळाडू शोएब बशीरला हिंदी येत नाही असे म्हणत त्याची खिल्ली उडवली आहे. यानंतर शोएब बशीरनेही सर्फराज खानला मजेशीर उत्तर दिले असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ 353 धावांवर सर्वबाद झाला आहे.
याबरोबरच, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडकडून शोएब बशीर आणि जो रूट फलंदाजी करत होते. त्यानंतर फिल्डिंग करताना सरफराज खान आपल्याला हिंदी अजिबात येत नाही, असे म्हणताना ऐकायला मिळाले होते. यानंतर शोएब बशीरने उत्तर दिले आहे की, मला थोडेसे हिंदी येते. त्यानंतर आता ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच युजर्स या पोस्टवर खूप मनोरंजक कमेंट्स देखील केल्या आहेत.
Haha Sarfaraz Khan. "Isko Hindi bhi aati hai badhiya chalo.." pic.twitter.com/Gvd9DbLQhT
— Addie Kumar (@adityeah) February 24, 2024
दरम्यान, रांची कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजी करताना इंग्लंडने पहिल्या डावात 353 धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून जो रुट 122 धावा करून नाबाद राहिला. याशिवाय ऑली रॉबिन्सनने या डावात आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. तसेच भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना रवींद्र जडेजाने 4, आकाश दीपने 3 आणि मोहम्मद सिराजने 2 विकेट्स घेतल्या आहेत.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.
महत्वाच्या बातम्या –
- IND vs ENG । ‘मलाच भीती वाटते…’, चाहतीच्या प्रश्नावर यशस्वी जयस्वालचे खास उत्तर
- रुटने पूर्ण केलं पिंकी प्रॉमिस! शतकासाठी बेन स्टोक्सलाही मिळालं पाहिजे श्रेय, पाहा व्हिडिओ