भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा टी20 सामना आज (25 जानेवारी) चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना जिंकून, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव मालिकेतील आपली आघाडी दुप्पट करण्याचा आणि माजी कर्णधार रोहित शर्माच्या खास क्लबमध्ये सामील होण्याचा प्रयत्न करेल. कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात सूर्या खाते न उघडता बाद झाला होता. परंतु तो चेन्नईमध्ये मोठी खेळी खेळू खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर सूर्यकुमार यादवने आज 5 षटकार मारले तर तो टी20 मध्ये 150 षटकार पूर्ण करेल. असे झाल्यास तो रोहित शर्मानंतर असा विक्रम करणारा दुसरा भारतीय ठरेल.
टी20 मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. हिटमॅनने त्याच्या कारकिर्दीत खेळलेल्या 159 सामन्यांपैकी 151 डावांमध्ये 2025 गगनचुंबी षटकार मारले आहेत. तो जागतिक क्रिकेटमधील एकमेव खेळाडू आहे ज्याच्या नावावर 200 पेक्षा जास्त टी20 षटकार आहेत.
रोहित शर्मा व्यतिरिक्त आणखी दोन खेळाडू आहेत. ज्यांनी 150 हून अधिक षटकार मारले आहेत. या यादीत न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल आणि यूएईचा मोहम्मद वसीम यांची नावे आहेत.
सूर्यकुमार यादव व्यतिरिक्त, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर देखील आज 150 षटकारांचा आकडा गाठू शकतो. बटलरने टी20 मध्ये 148 षटकार मारले आहेत. तो 150 षटकारांच्या क्लबमध्ये सामील होण्यापासून फक्त दोन फटके दूर आहे.
टी20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू-
रोहित शर्मा – 205
मार्टिन गुप्टिल – 173
मोहम्मद वसिम – 158
निकोलस पुरन – 149
जोस बटलर – 148
सूर्यकुमार यादव – 145
सूर्यकुमार यादवने आतापर्यंत 79 टी20 सामने खेळले आहेत. ज्यात त्याने 40.15 च्या सरासरीने आणि 167.53 च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने 2570 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 233 चौकार आणि 145 षटकार मारले आहेत.
हेही वाचा-
‘देशांतर्गत स्पर्धा आयपीएलच्या बरोबरीची…’, वरुण चक्रवर्तीने त्याच्या यशाचे रहस्य उलगडले
वयाच्या 43व्या वर्षी एमएस धोनीची ‘बाहुबली’ फिटनेस, सरावाचा VIDEO समोर
IND VS ENG; संघ निवडीत मोठी चूक! दुखापतग्रस्त अभिषेक शर्माचा पर्याय भारताकडे नाही