भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची टी20 मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेला उद्या म्हणजेच 22 जानेवारीपासून सुरूवात होत आहे. ज्यातील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघांमधील मालिका रोमांचक होण्याची आशा आहे. दोघांमध्ये अनेकदा चांगलीच लढत दिसून आले आहे. चला तर या बातमीद्वारे दोन्ही संघांमधील हेड टू हेड रेकॉर्ड कसा आहे ते जाणून घेऊयात.
भारतीय क्रिकेट संघाने टी20 स्वरूपात वरचढ कामगिरी केली आहे. दोन्ही संघांमध्ये या फॉरमॅटमध्ये एकूण 24 सामने खेळले गेले आहेत. यापैकी टीम इंडियाने 13 सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडने 11 सामने जिंकले आहेत. आकडेवारीनुसार, टीम इंडियाने इंग्लंडवर वर्चस्व गाजवले आहे. भारतात दोन्ही संघांमध्ये एकूण 11 सामने खेळले गेले आहेत. यापैकी 6 सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. तर इंग्लंडने 5 सामने जिंकले आहेत.
आतापर्यंत कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर भारत आणि इंग्लंड यांच्यात फक्त एकच टी-20 सामना खेळला गेला आहे. हा सामना 2011 मध्ये खेळला गेला होता. या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा 6 विकेट्सने पराभव केला. 29 ऑक्टोबर 2011 रोजी झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 9 विकेटच्या मोबदल्यात 120 धावा केल्या. इंग्लंडने 18.4 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य पूर्ण केले.
टी20 मालिकेसाठी दोन्ही संघ पुढीलप्रमाणे
भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, नितीश रेड्डी, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, ध्रुव जुरेल, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर.
इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल साल्ट, मार्क वूड.
हेही वाचा-
‘हा जगाने पाहिलेला सर्वात महान व्हाईट बॉल क्रिकेटपटू …’, माजी कर्णधाराकडून विराटची पाठराखण?
रिंकू सिंगने पुन्हा मन जिंकले, वडिलांना दिला खास भेट, सोशल मीडियावर वाह.! वाह..!!
नाशिकमध्ये क्रिकेटचा मोठा सामना, भारतीय क्रिकेटर दिसणार ॲक्शनमध्ये