---Advertisement---

IND vs ENG Test Series: स्टार स्पोर्ट्सने जाहीर केले दिग्गज समालोचकांचे पॅनेल!

On: शनिवार, जून 14, 2025 7:42 PM
---Advertisement---

India vs England Test Series: 20 जूनपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी अधिकृत ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सने शनिवार, (14 जून) रोजी इंग्लिश, हिंदी, तमिळ आणि तेलुगू समालोचन पॅनेलची घोषणा केली आहे. या पॅनेलमध्ये जगभरातील दिग्गज खेळाडू आणि क्रिकेट तज्ञांचा समावेश आहे, ज्यात रवी शास्त्री, दिनेश कार्तिक, नासिर हुसेन, स्टुअर्ट ब्रॉड आणि नवजोत सिंग सिद्धू यांचा समावेश आहे. भारत-इंग्लंड मालिकेसाठी सर्व भाषांमधील समालोचन पॅनेलची संपूर्ण यादीवर एक नजर टाकूयात. (IND vs ENG Commentary Panel)

भारत-इंग्लंड मालिकेत एकापेक्षा एक क्रिकेट तज्ञ समालोचन करणार आहेत, ज्यामुळे क्रिकेट चाहत्यांना मालिका पाहण्याचा आनंद आणखी वाढेल. तसेच, चाहत्यांना तज्ञांकडून खेळातील बारकावे समजून घेण्याची संधी मिळेल.

इंग्लिश समालोचन पॅनेल: रवी शास्त्री, दिनेश कार्तिक, नासिर हुसेन, मायकेल एथर्टन, स्टुअर्ट ब्रॉड, नवजोत सिंग सिद्धू, अनिल कुंबळे, संजय मांजरेकर, अभिनव मुकुंद

हिंदी समालोचन पॅनेल: नवजोत सिंग सिद्धू, अनिल कुंबळे, संजय मांजरेकर, पार्थिव पटेल, संजय बांगर, वरुण आरोन, दीप दासगुप्ता, अनंत त्यागी आणि पदमजीत सेहरावत

तमिळ समालोचन पॅनेल: अभिनव मुकुंद, एस. बद्रीनाथ, रमेश, अनिरुद्ध श्रीकांथ, यो महेश, आर. श्रीधर, नानी आणि मुथू

तेलुगू समालोचन पॅनेल: एमएसके प्रसाद, हनुमा विहारी, आर. श्रीधर, टी. सुमन, आशिष रेड्डी, कल्याण कृष्णा, एनसी कौशिक (IND vs ENG Commentary Panel)

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ– शुबमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव (Team India Test Squad)

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक
भारतीय संघ 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. या मालिकेतील पहिला सामना 20 जूनपासून हेडिंग्ले येथे खेळला जाईल. दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून बर्मिंगहॅममध्ये सुरू होईल. तर तिसरा सामना 10 जुलैपासून लॉर्ड्समध्ये खेळला जाईल. मालिकेतील चौथा सामना 23 जुलैपासून मँचेस्टरमध्ये, तर शेवटचा सामना 31 जुलैपासून लंडनच्या ओव्हल मैदानावर होईल. (India England Test Schedule)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---