रविचंद्रन अश्विन गुरुवारी (7 मार्च) इंग्लंडविरुद्ध धरमशाला याठिकाणी कारकिर्दीतील 100वा कसोटी सामना खेळणार आहे. उभय संघांतील ही कसोटी मालिका पाच सामन्यांची आहे. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना गुरुवारी सुरू होईल. अश्विनसाठी हा सामना खूपच खास आहे. पण दिग्गज फिरकीपटूने एका गोष्टीची खंत व्यक्त केली, जे त्याला संपूर्ण कारकिर्दीत करता आले नाही.
रविंचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) भारताचा दुसरा सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाज आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत देखील त्याने भारतीय संघासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. मालिकेतील शेवटच्या सामन्यात देखील त्याच्याकडून अशाच प्रदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अश्विन या सामन्यासाठी मैदानात पाय टाकताच भारताकडून 100 कसोटी खेळणारा 14वा खेळाडू बनले. त्याने 507 कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. 500 पेक्षा जास्त कसोटी विकेट्स घेणारा अश्विन अनिल कुंबळे यांच्यानंतर केवळ दुसराच गोलंदाज आहे. अश्विनची क्रिकेट कारकीर्द मोठी असली, तरी त्याने कधीच आपल्याला मिळालेले यश मनसोक्त पद्धतीने साजरी केले नाही. फिरकीपटूने नुकतीच याबाबत प्रतिक्रिया देखील दिली.
माजी दिग्गज अनिल कुंबळे यांच्याशी बोलताना अश्विनने काही खास गोष्टींवर प्रकाश टाकला. कुंबळेंनी त्याला प्रश्न विचारला की, “कोणताही दौरा झाल्यानंतर तू कोणासोबल बोलतो?” यावर अश्विन म्हणाला, “मी नेहमी एकाच व्यक्तीकडे जातो. या गोष्टी त्या व्यक्तिसाठी खूप तनावपूर्ण असतात. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून मीच आहे. कारण मला वाटते क्रिकेट सर्वात जास्त आत्म परिक्षणाच्या खेळांपैकी एक आहे. मला वाटते तुम्ही स्वतःशी प्रामाणत असाल, तर तुमच्यासमोर सत्य झळकते. भारतात टीका करणारे खूप आहेत. यातील 10जण तुम्हाला चुकीचं सांगतील, पण 10 जण बरोबर देखील सांगतात.”
“त्यामुळे मी नेहमी म्हणत आलो आहे की, माझे सर्वात मोठे दु:ख हेच आहे की, मिळालेल्या यशाचा तितका आनंद घेऊ शकलो नाही, जितका घेतला पाहिजे होता. पण यामुळे मी एक चांगला क्रिकेटपटू बनलो. गोष्टी सुधारताना मदत मिळाली.”
दरम्यान, धरमशाला कसोटी सामना सुरू होण्याआधी भारतीय संघ 3-1 अशा आघाडीवर आहे. शेवटचा सामना जरी इंग्लंड संघ जिंकू शकला, तरी मालिका मात्र यजमान भारताने आधीच नावावर केली आहे. (IND vs ENG. ‘The biggest sadness is that…’ Ashwin expressed his regret before the Dharamsala Test)
महत्वाच्या बातम्या –
क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज । चुरशीच्या लढतीत नांदेडची रत्नागिरी संघावर मात.
रोहितला काही फरक पडत नाही! मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन्सीबाबत बोलला माजी वेगवान गोलंदाज