---Advertisement---

IND vs ENG; भारताच्या पराभवाची पटकथा लिहणारे इंग्लंडचे हे 3 खेळाडू

On: बुधवार, जून 25, 2025 11:31 AM
Ben Stokes
---Advertisement---

बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 5 विकेट्सने पराभव केला. भारताने 371 धावांचे लक्ष्य दिले होते, जे यजमान संघाने सहज गाठले. इंग्लंडने कसोटी क्रिकेटमधील दुसरे सर्वात मोठे लक्ष्य गाठले आहे. विक्रमी विजय नोंदवल्यानंतर, स्टोक्सने भारताच्या पराभवाची कथा लिहिणाऱ्या इंग्लंडच्या तीन खेळाडूंची नावे घेतली. त्याने विजयाचे श्रेय सलामीवीर बेन डकेट, जॅक क्रॉली आणि वेगवान गोलंदाज जोश टँग यांना दिले.

डकेट आणि क्रॉलीने लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला मजबूत सुरुवात दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी 188 धावांची भागीदारी करून भारताला बॅकफूटवर आणले. डकेटने 170 चेंडूत 21 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 149 धावांची खेळी खेळली. क्रॉलीने 126 चेंडूत 65 धावा केल्या, ज्यामध्ये सात चौकारांचा समावेश होता. तर टँगने सामन्यात सात विकेट्स घेतल्या. भारताच्या खालच्या फळीला स्वस्तात बाद करण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे दोन्ही डावात अपेक्षित धावसंख्या झाली नाही. एकेकाळी पहिल्या डावात भारताचा स्कोअर 3 बाद 359 होता, परंतु संपूर्ण संघ 471 धावांवर गारद झाला. दुसऱ्या डावातही भारताने शेवटचे सहा विकेट फक्त 77 धावांत गमावले.

लीड्स कसोटीत विजयानंतर स्टोक्स म्हणाला, “या मैदानावर आमच्या जुन्या आठवणींमध्ये आता एक नवीन सुंदर आठवण जोडली गेली. टॉस जिंकून आम्ही खेळपट्टीवरील गवत आणि ओलाव्याचा अंदाज घेऊन गोलंदाजी निवडली, कारण तीच आमच्यासाठी जिंकण्याची सर्वोत्तम संधी होती. जॅक क्रॉली आणि डकेटची भागीदारी निर्णायक ठरली. टँगचा मारा दोन्ही डावांत गेम चेंजर ठरला. ही मालिका दमदार सुरू झाली आहे, अजून चार सामने बाकी आहेत.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---