Ind vs Eng : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यातील मालिका 1-1 ने बरोबरीत असल्याने रंगतदार स्थितीत आहे. आता या मालिकेतील तिसरा सामना हा 15 फेब्रुवारीपासून राजकोट येथे खेळवण्यात येणार आहे. तर हा सामना जिंकून दोन्ही संघांचा मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ तगड्या प्लेईंग ईलेव्हनसह मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे. तसेच, इंग्लंडचा संघ वेगळ्या रणनीतीने या सामन्यात प्रवेश करू शकतो.
याबरोबरच, गुरुवारपासून सुरु होणारा भारताविरुद्धचा सामना हा स्टोक्सचा १०० वा कसोटी सामना असणार आहे. इंग्लंडचे नेतृत्व स्वीकारल्यानवंतर बेन स्टोक्सने अनेक आव्हानात्मक परिस्थितीत संघाला काही अविस्मरणीय विजय मिळवून दिलेले आहे. बॅझबॉल या नव्या पवित्र्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये बेडर कर्णधार अशी स्वतःची ओळखही निर्माण केली आहे. इंग्लंडने मिळवलेल्या ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय विश्वकरंडक विजेतेपदामध्येही त्याने मोलाची कामगिरी केलेली आहे.
अशातच इंग्लंडचा संघ तिसऱ्या कसोटीत जेम्स अँडरसन आणि मार्क वुडला एकत्र मैदानात उतरवू शकतो. तसेच अँडरसन विशाखापट्टणम कसोटी खेळला होता, तर वुड हैदराबादमध्ये खेळला होता. याबरोबरच, दुसऱ्या कसोटीत इंग्लंडने तीन प्रमुख फिरकीपटू टॉम हार्टली, रेहान अहमद, शोएब बशीर आणि चौथा फिरकी गोलंदाज जो रूट याच्यासोबत खेळला होता.
जर स्टोक्स राजकोटमध्ये खेळला तर 100 कसोटी सामने खेळणारा तो क्रिकेट इतिहासातील 74 वा क्रिकेटपटू ठरेल. तसेच अशी कामगिरी करणारा तो इंग्लंडचा 16 वा खेळाडू ठरणार आहे. तर स्टोक्सने 2013 मध्ये कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर या डावखुऱ्या फलंदाजाने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. तो जगातील अव्वल अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. तसेच स्टोक्सने इंग्लंडकडून 99 कसोटी सामन्यांमध्ये 6251 धावा केल्या आहेत. यामध्ये स्टोक्सने 13 शतके आणि 31 अर्धशतके केली आहेत.
दरम्यान, संघाला गरज लागली तेव्हा स्टोक्स हमखास मदतीला धावून आलेला आहे. ॲशेस मालिकेतील लॉर्डस येथे झालेला सामना आणि त्यात स्टोक्सने केलेली फलंदाजी आम्ही कोणीच विसरू शकत नाही, असे पोपने सांगितले. १०० कसोटी खेळणे ही फार मोठी कामगिरी असते. त्यानेही आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत काही चढ उतार अनुभवले आहेत, पण कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्याच्यातील बदल अफलातून आहे, असे पोप म्हणाला आहे.
महत्वाच्या बातम्या –
- IPL : बीसीसीआयचा खेळाडूंना थेट इशारा, किमान ३-४ रणजी सामने खेळावेच लागणार
- Ind vs Eng : भारतीय संघात होणार मोठे बदल; यष्टिरक्षकाचा पत्ता कट, त्रिशतक ठोकणाऱ्याची Playing 11 मध्ये एन्ट्री