IPL : भारत आणि इग्लंड यांच्यामध्ये सध्या 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. तर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना गुरुवारपासून राजकोटमध्ये खेळला जाणार आहे. तसेच विशाखापट्टणम येथे खेळली गेलेली दुसरी कसोटी जिंकून त्याने शानदार पुनरागमन केले. हैदराबादमधील पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली होती. अशातच बीसीसीआयने रणजी ट्रॉफीमध्ये भाग न घेतल्याने वरिष्ठ खेळाडूंना थेट इशारा दिला आहे.
भारतीय खेळाडू रणजी क्रिकेटमध्ये खेळणे सोडून आयपीएलसाठी हार्दिक पंड्यासह सराव करण्यात मन्ग असलेल्या इशान किशन प्रकरणामुळे बीसीसीआयचे पदाधिकारी नाराज झाले आहेत. याबरोबरच, खेळाडूंना आयपीएल खेळायची असेल तर 3 ते 4 रणजी सामने खेळावे लागतील असा नियम केला जाण्याची दाट शक्यता आहे. तसेच बीसीसीआयने सर्व खेळाडूंना ईमेल देखील केला आहे.
याबरोबरच, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावेळी मानसिक थकवा आल्याचे कारण देत इशान किशन गायब झाला होता. तसेच इशान किशनला झारखंडकडून किमान दोन रणजी सामने खेळावे अशी अप्रत्यक्ष सुचना देखील देण्यात आली होती. तर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक बरोबर इशान बडोद्यात सराव करताना दिसून येत आहे. तसेच बडोद्याचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या आणि राजस्थानचा वेगवान गोलंदाज दीपक चहर यांनी आधीच आयपीएलची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे बीसीसीआय पुढील काळात कडक नियमच तयार करण्याच्या तयारीत आहे.
दरम्यान, रणजी स्पर्धेतील अखेरचे साखळी सामने १६ तारखेपासून सुरु होत आहे. झारखंडचा सामना राजस्थानविरुद्ध होत आहे. या सामन्यात इशानला खेळण्याचे आदेश बीसीसीआयकडून देण्यात आले आहेत. तसेच अनेक खेळाडू जर भारतीय संघात नसतील तर रेड बॉल क्रिकेट खेळणे टाळत आहेत. असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले आहे.
घ्या जाणून शेवटच्या 3 कसोटीसाठी भारतीय संघ :-
टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप, रवींद्र जडेजा (फिटनेसवर अवलंबून).
इंग्लंड क्रिकेट टीम | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन, मार्क वुड, ऑली रॉबिन्सन, डॅनियल लॉरेन्स आणि गस ऍटकिन्सन.
महत्वाच्या बातम्या –