---Advertisement---

Ind vs Eng : मोठी बातमी! बुमरा इंग्लंडविरुद्धच्या ‘या’ कसोटी सामन्यातून बाहेर? BCCI च्या सूत्राने दिली माहिती

On: बुधवार, फेब्रुवारी 14, 2024 10:35 AM
Jasprit Bumrah
---Advertisement---

Ind vs Eng : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका संध्या सुरू आहे. तर आता या मालिकेतील तिसरा सामना हा 15 फेब्रुवारीपासून राजकोट येथे खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकून दोन्ही संघांचा मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ तगड्या प्लेईंग ईलेव्हनसह मैदानात उतरणार आहे. याबरोबरच, भारतीय संघ आणि चाहत्यांची डोकेदुखी वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. 

भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला चौथ्या सामन्यातून विश्रांती दिली जाऊ शकते. तसेच याचे मोठे कारण देखील सध्या समोर आले आहे. कारण अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हा  शेवटच्या कसोटी सामन्यासाठी बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त असावा, अशी संघ व्यवस्थापनाची इच्छा आहे आणि त्यामुळेच त्याला चौथ्या कसोटी सामन्यातून विश्रांती देण्यात येणार आहे.

याबरोबरच, विशाखापट्टणम कसोटी सामन्यात भारताच्या विजयात जसप्रीत बुमराहचे खुप मोठे योगदान होते. तसेच त्याने विशाखापट्टणममध्ये पहिल्या डावात 45 धावांत 6 विकेट्स घेतल्या होत्या. तर दुसऱ्या डावातही त्याने 46 धावांत 3 बळी मिळवल्या होत्या. तसेच जसप्रीत बुमराची कोणत्याही कसोटी सामन्यातील त्याची दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. या सामन्यात बुमराहने 150 कसोटी बळींचा उच्चाक आकडाही गाठला आहे.

यानंतर अनुभवी वेगवान गोलंदाजाला तिसऱ्या सामन्याऐवजी चौथ्या सामन्यातून विश्रांती देण्यात येणार आहे. तर बुमरा तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळताना पहायला मिळणार आहे. तसेच  जसप्रीत बुमराहला रांची येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यातून विश्रांती दिली जाऊ शकते. यासह धर्मशाला येथे होणाऱ्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यासाठी तो पूर्णपणे फ्रेश राहील.

दरम्यान, भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना 106 धावांनी जिंकला होता. टीम इंडियासाठी गोलंदाज आणि फलंदाजांनी दमदार कामगिरी केली होती. तसेच यशस्वी जैस्वालने द्विशतक झळकावले आणि 209 धावांची खेळी खेळली. याशिवाय शुभमन गिलने शतक झळकावले होते. तसेच जसप्रीत बुमराह दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियासाठी सर्वात मोठा हिरो म्हणून उदयास आला होता. तसेच या सामन्यात त्याने एकूण 9 विकेट घेतल्या होत्या. त्याच्यामुळेच टीम इंडियाला सामना जिंकण्यात यश आले. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---