भारतीय संघाने इंग्लंडवर दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. त्यानंतर आता दोन्हीं संघामध्ये तिसरा सामना हा 15 फेब्रुवारीपासून राजकोट येथे होणार आहे. तसेच हा तिसरा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. अशात इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटच्या वक्तव्याने तिसऱ्या कसोटी अगोदर वातावरण निर्माण केले आहे.
याबरोबरच, पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने गेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये सलामीला फलंदाजी करूनही रोहित शर्माला आपली छाप सोडता आली नाही. तसेच पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची धावसंख्या 24, 39, 14 आणि 13 धावा आहे. तर, विराट कोहलीने वैयक्तिक कारणामुळे पहिल्या दोन सामन्यांमधून नाव मागे घेतले होते.
तिसऱ्या कसोटीपूर्वी इंग्लंडच्या ड्रेसिंग रुममध्ये झालेल्या चर्चेबाबत रूटने सांगितले आहे की, “आमच्याकडे यापुढे टीम मीटिंग्स नाहीत. ही एक छान गोष्ट आहे की आम्ही आमची सर्व संभाषणे खेळापासून दूर कशी करतो आणि एकमेकांसोबत वेळ घालवतो आणि चर्चा करतो. आम्हाला मीटिंग रूममध्ये बसण्याची गरज नाही आणि मला असे वाटते की जेव्हा तुम्ही रात्रीच्या जेवणाच्या टेबलाभोवती बोलू शकता तेव्हा ते अधिक वास्तविक असते. सकाळी कॉफी किंवा काहीतरी. मला वाटते जेव्हा तुम्ही तुमचे सर्वोत्तम शिकू शकता.
तसेच, रोहित आणि कोहलीचा संदर्भ देत जो रूट म्हणाला आहे की, “आम्ही याकडे नक्कीच लक्ष देऊ कारण आम्हाला माहित आहे की रोहित आणि विराट ते चांगले खेळाडू आहेत आणि ते यावेळी भारतीय फलंदाजीतील खूप वरिष्ठ खेळाडू आहेत, त्यामुळे त्यांची यात मोठी भूमिका आहे.
त्यामुळे त्यांना लवकर रोखण्यासाठी आम्हाला सुरुवातीपासूनच प्रयत्न करावे लागतील कारण त्यांच्याकडे मोठी धावसंख्या करण्याची क्षमता आहे. तसेच आम्ही अनेकदा चुकीच्या निकालापर्यंत पोहोचलो आहोत.” असे जो रूट म्हणाला आहे.
दरम्यान, दुसऱ्या कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वालच्या पहिल्या डावात 209 धावा आणि शुबमन गिलच्या तिसऱ्या कसोटी शतकासह भारताने 106 धावांनी विजय नोंदवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली होती. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष हे तिसऱ्या कसोटी सामन्यांकडे लागले आहे.
महत्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष: सर्वाधिक फलंदाजांना शून्यावर बाद करणारा अवलिया, ज्याला संघ सहकारी म्हणायचे ‘कबूतर’
U19 World Cup Final: ठरलं! वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पुन्हां एकदा भारत ऑस्ट्रलिया वर्ल्डकप फायनल सामना…