---Advertisement---

अरेरे! घरच्या मैदानवरच आली वॉशिंग्टन सुंदरवर वाईट वेळ, विनोद कांबळीच्या नकोशा विक्रमाची केलीय बरोबरी

On: मंगळवार, फेब्रुवारी 9, 2021 10:50 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड संघादम्यान नुकताच चेन्नई येथे पहिला कसोटी सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने सांघिक कामगिरीच्या बळावर शानदार विजय मिळवला. भारतासाठी या सामन्यातील काही सकारात्मक बाबींमध्ये वॉशिंग्टन सुंदरची पहिल्या डावतील फलंदाजी गणली जावू शकते. पहिल्या डावात शानदार अर्धशतक झळकावणारा सुंदर दुसऱ्या डावात मात्र शून्यावर बाद झाला. सुंदरने शून्यावर बाद होताच एका नको असलेल्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

सुंदर हा मूळचा चेन्नईचा आहे. सुंदरने आपल्या घरच्या मैदानावर शून्यावर बाद होत २७ वर्षांच्या मोठ्या अंतरा नंतर विनोद कांबळींच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. सुंदर आपल्या घरच्या मैदानावर सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन शून्यावर बाद होणार मागील २७ वर्षातील केवळ दुसराच खेळाडू ठरला आहे. कांबळी हे १९९४ साली मुंबईत आपल्या घरच्या मैदानावर खेळताना वेस्ट इंडिज विरुद्ध शून्यावर बाद झाले होते.

सुंदर जरी दुसऱ्या डावात शून्यावर बाद झाला असला तरी त्याने पहिल्या डावात शानदार कामगिरी केली होती. सुंदरने पहिल्या डावात १३८ चेंडूत १२ चौकार व २ षटकारांच्या मदतीने नाबाद ८५ धावा केल्या होत्या. सुंदरच्या या शानदार कामगिरीमुळेच भारतीय संघाला आपल्या पहिल्या डावात ३३७ धावा बनवण्यात यश मिळाले होते.

दरम्यान सामन्याचा विचार केला असता, इंग्लंडने संपूर्ण सामन्यात शानदार कामगिरी केली. इंग्लंडने सांघिक कामगिरीच्या बाळावर भारताचा पराभव केला. विशेषतः भारतीय फलंदाजांविरुद्ध इंग्लंडच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. भारताचा पहिला डाव ३३७ धावांवर संपुष्टात आला होता. भारताकडून रिषभ पंतने ९१, चेतेश्वर पुजाराने ७३ आणि वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ८५ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. इंग्लंडने जो रुटच्या २१८ धावांच्या द्विशतकी आणि डॉम सिब्ली(८७) व बेन स्टोक्सच्या(८२) अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या डावात ५७८ धावा उभारल्याने त्यांनी पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी घेतली होती.

यानंतर इंग्लंडने फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दुसऱ्या डावात सर्वबाद १७८ धावा केल्या आणि पहिल्या डावातील २४१ धावांच्या आघाडीसह भारताला ४२० धावांचे आव्हान दिले होते. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर ४२० धावांचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ७२ धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ शुबमन गिलने ५० धावांची खेळी केली. अन्य कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा टप्पाही पार करता आला नाही. इंग्लंडकडून या डावात जॅक लीचने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर जेम्स अँडरसनने ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय डॉमनिक बेस  बेन स्टोक्सने आणि जोफ्रा आर्चरने प्रत्येकी १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या-

वेड क्रिकेटचे! भारत-इंग्लंड कसोटीचे चक्क लग्न सोहळ्यात लाइव्ह-स्ट्रिमिंग, फोटो तूफान व्हायरल

सलग सात डावांत फ्लॉप ठरलेल्या रहाणेबद्दल कर्णधार कोहलीने दिली रोकठोक प्रतिक्रिया, रहाणे म्हणजे…

वाढदिवस विशेष: सर्वाधिक फलंदाजांना शून्यावर बाद करणारा अवलिया, ज्याला संघ सहकारी म्हणायचे ‘कबूतर’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---