इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करणार आहे. केएल राहुल आणि रविंद्र जडेजा या दोन फलंदांनी दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून माघार घेतली. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडसाठी फिरकीपटू टॉम हार्टली याने जबरदस्त गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी दिग्गज हरभजन सिंग याने भारतीय संघ व्यवस्थापनाला अप्रत्यक्षपणे सल्ला दिला आहे.
हरभजन सिंग (Harbhajan Singh) याच्या मते भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात चार फिरकी गोलंदाज खेळवले पाहिजेत. उभय संघांतील पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन-तीन फिरकी गोलंदाजांना खेळवले होते. टॉम हार्टली याच्यासाठी हा कसोटी क्रिकेटमधील पदार्पणाचा सामना होता. त्याने हैदराबादमध्ये दुसऱ्या डावात 7 विकेट्स गेत इंग्लंडला विजय मिळवून दिला. दुसरीकडे भारतासाटी अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी फिरकीच्या जोरावर इंग्लंडचा घाम काढला.
भारतीय खेलपट्टी नेहमीप्रामाणे याही वेळी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर हरभजन सिंग आपल्या युट्यूब चॅनलवर म्हणाला, “भारताने जो संघ निवडला आहे, ते पाहता मला आशा आहे की, तो टर्निंग ट्रॅक असेल. पहिल्या कसोटीप्रमाणे दुसऱ्या कसोटीत देखील चेंडू वळाला, तर पूर्ण शक्यता आहे की, भारतीय संघ चार फिरकी गोलंदाजांना खेळवेल. जसप्रीत बुमराह संघात एकटा वेगवान गोलंदाज असेल.” हरभजनने यावेली अप्रत्यक्षपणे मोहम्मद सिराज याला संघातून वगण्याचा सल्ला संघ व्यवस्थापनाला दिल्याचे दिसते.
दरम्यान, इंग्लंडने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 28 धावांनी विजय मिळवला होता. हैदराबादमध्ये उभय संघांतील हा पहिला सामना पार पडला. विजयासाठी शेवटच्या डावात बारताला 231 धावा हव्या होत्या. पण प्रत्युत्तरात भारतीय संघ 69.2 षटकांमद्ये 202 धावांपर्यंत मजल मारू शकला. उभय संघांतील दुसरा कसोटी सामना शुक्रवारी (2 फेब्रुवारी) विशाखापट्टणममध्ये सुरू होईल. या सामन्यात फिरकी गोलंदाजांनी संधी दिली, तरी भारताला फलंदाजी क्रमात युवा खेळाडूंना सामील करावे लागणार आहे. (IND vs ENG. Will India play with four spinners? Indirect advice from a former legend to the team)
महत्वाच्या बातम्या –
ENG vs ENG । दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची रणनीती ठरली; मॅक्युलम म्हणतोय, ‘घाबरत नाही…’
आईविषयी चुकीच्या बातम्यांनी संतापला विराटचा भाऊ, गैरसमज दूर करण्यासाठी केली इस्टा पोस्ट