भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तत्पूर्वी दोन्ही संघातील खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला. पण भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नाही. आता (25 जानेवारी) रोजी खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या टी20 सामन्यात शमीला स्थान मिळणार की नाही? याबद्दल जाणून घेऊया.
टीम इंडियाच्या अनुभवी वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेला मोहम्मद शमी गेल्या 14 महिन्यांनंतर संघात पुनरागमन करत आहे. टाचेच्या दुखापतीमुळे तो भारतीय संघाच्या बाहेर पडला होता. शमीने 2023च्या एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. नंतर त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. पण आणखी प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड करण्यात आले नाही. इंग्लंडविरूध्दच्या पहिल्या टी20 सामन्यात शमी खेळताना दिसेल असे सर्व सर्वांना वाटत होते, पण तसे झाले नाही.
कोलकातामध्ये झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने भारतीय संघात 3 फिरकीपटूंना खेळवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शमीला प्लेइंग इलेव्हच्या बाहेर राहावे लागले. तसेच 3 फिरकीपटूंसोबत फक्त एका वेगवान गोलंदाजाला (अर्शदीप सिंग) संघात स्थान देण्यात आले होते. पण चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी फिरकी गोलंदाजीला साथ देत असल्याने दुसऱ्या टी20 सामन्यात सामन्यात सूर्यकुमार यादव पुन्हा 3 फिरकीपटूंसोबत मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोहम्मद शमीला दुसऱ्या टी20 सामन्यात स्थान मिळणार की नाही यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.
दुसऱ्या टी20 सामन्यासाठी भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग
हेही वाचा-
बाद होऊन परतलेला खेळाडू पुन्हा 5 मिनीटांनी फलंदाजीस, रणजी सामन्यात घडला भलताच प्रकार!
ind vs eng; सामन्याच्या एकदिवसाआधीच प्लेइंग इलेव्हनची घोषणा, स्टार खेळाडूची एंट्री!
रोहित-रहाणे फ्लाॅप, शार्दुल ऑन टाॅप, लाॅर्ड ठाकूरची दमदार शतकी खेळी, मुंबई संकटातून बाहेर