---Advertisement---

IND vs ENG : यशस्वी राजकोट कसोटीत पुन्हा करणार फलंदाजी? घ्या जाणून ICC चा नियम

On: रविवार, फेब्रुवारी 18, 2024 10:17 AM
---Advertisement---

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना राजकोट येथे खेळला जात आहे. तर या सामन्यात तीन दिवसांच्या खेळानंतर भारतीय संघाने इंग्लंडवर आपली पकड अधिक मजबुत केली आहे. याबरोबरच भारतीय सघांला तिसऱ्या दिवशी एक मोठा झटका बसला आहे. कराण, राजकोट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शतक झळकावल्यानंतर यशस्वी जैस्वाल रिटायर्ड हर्ट झाला होता. अशा परिस्थितीत यशस्वी जैस्वाल पुन्हा फलंदाजी करू शकेल की नाही ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

आयसीसीच्या नियमानुसार, एक फलंदाज डावात कधीही रिटायर्ड आऊट होऊ शकतो. तसेच एकदा फलंदाज जाणूनबुजून रिटायर्ड आऊट झाला का, विरोधी कर्णधाराने परवानगी दिल्याशिवाय तो सामन्यात आपला डाव पुन्हा सुरू करू शकत नाही.

याबरोबरच, तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात झंझावाती शतक ठोकलं आहे. तसेच यशस्वीने या शतकादरम्यान तोडफोड बॅटिंग करत मैदानाच चौफेर फटकेबाजी केली आहे. तसेच इंग्लंडच्या गोलंदाजांना झोडून काढला. यशस्वीने इंग्लंड विरुद्धच त्यांच्याच पद्धतीने बेझबॉल स्टाईलने सेंच्यूरी पूर्ण केली आहे.

अशातच मैदानावर कोणताही गेम खेळताना दुखापत होते, आणि क्रिकेट यापेक्षा वेगळे नाही. नेटवर सराव करताना किंवा सामन्यादरम्यान खेळाडूंना दुखापत होऊ शकते. आता, सरावाच्या वेळी खेळाडूला दुखापत झाल्यास, दुखापतीचे मूल्यांकन केल्यानंतर तो काही दिवस विश्रांती घेऊ शकतो. पण सामन्यादरम्यान एखाद्या फलंदाजाला दुखापत झाली तर? तेव्हाच रिटायर हर्ट नियम लागू होतो. पण रिटायर हर्ट हा रिटायर्ड आऊट होण्यापेक्षा वेगळा शब्द आहे.

दरम्यान, यशस्वी जयस्वाल याचं इंग्लंड विरुद्धच्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील हे दुसरं शतक ठरलं. यशस्वीने 80 बॉलमध्ये अर्धशतक तर 122 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. यशस्वीने या शतकी खेळीत 9 चौकार आणि 5 सिक्स लगावले. यशस्वीने 81.97 च्या स्ट्राईक रेटने हे शतक झळकावलं आहे.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---