भारतीय क्रिकेट संघाने २४ ऑक्टोबर रोजी दुबईत पाकिस्तानविरुद्धच्या टी२० विश्वचषकात आपल्या मोहिमेची सुरुवात केली. अशा स्थितीत भारतीय संघाला ७ दिवसांच्या दीर्घ कालावधीनंतर न्यूझीलंडचा सामना करावा लागणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी आभासी उपांत्यपूर्व फेरीत बदलला आहे. कारण, पाकिस्तानने आतापर्यंत खेळलेले तिन्ही सामने जिंकून उपांत्य फेरीतील स्थान जवळपास पक्के केले आहे. त्यांना स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध उर्वरित दोन सामने खेळायचे आहेत.
भारत आणि न्यूझीलंडमध्ये होणार द्वंद
भारत आणि न्यूझीलंडला उपांत्य फेरीसाठी उरलेल्या एका जागेसाठी संघर्ष करावा लागणार आहे. दोन्ही संघ पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना हरले आहेत. दोन्ही संघांकडे आपले उर्वरित चार सामने जिंकून उपांत्य फेरी गाठण्याचा सोपा मार्ग आहे. अशा परिस्थितीत जो संघ चार सामने जिंकेल त्याला ८ गुण मिळतील आणि निव्वळ धावगती खूप कमी असली तरी त्याचा उपांत्य फेरी गाठण्यावर कोणताही परिणाम होणार नाही. अशा परिस्थितीत उपांत्य फेरीच्या मार्गात दोन्ही संघ एकमेकांसाठी सर्वात मोठा अडथळा आहेत.
अशी गाठता येणार उपांत्य फेरी
जर भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आणि न्यूझीलंड संघाने उर्वरित सर्व सामने जिंकले तर भारतीय संघाचा प्रवास साखरी फेरीतच संपुष्टात येईल. शेवटी उपांत्य फेरी गाठण्यासाठी अफगाणिस्तान आणि नामिबियासारख्या संघांच्या कामगिरीवरही भारतीय संघाचे भवितव्य अवलंबून असेल.
या दोन्ही संघांकडून धोका
अफगाणिस्तान आणि नामिबिया हे दोन्ही संघ उलटफेर करण्यात पटाईत आहेत. यापैकी कोणताही संघ न्यूझीलंडला पराभूत करण्यात यशस्वी ठरला तर भारतासोबतच अफगाणिस्तानचीही उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता वाढेल. अफगाणिस्तान, भारत आणि न्यूझीलंडचे संघ साखळी फेरीतील सर्व सामने जिंकू शकले, तर नेट रन रेट दुसऱ्या उपांत्य फेरीतील संघाचे नाव निश्चित करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० क्रिकेट असो वा विश्वचषक, दक्षिण आफ्रिकाच पडलीय श्रीलंकेवर भारी; यंदा पलटणार का बाजी?
पाकिस्तानच्या विजयाच्या हॅट्रिकने बदललं गुणतालिकेचं समीकरण, ‘हा’ संघ सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर