भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 21 धावांनी पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे, न्यूझीलंडनेही विजय साकारत मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. आता उभय संघात दुसरा टी20 सामना रविवारी (दि. 29 जानेवारी) खेळला जाणार आहे. मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारतीय संघासाठी हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे, भारतीय संघाने हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात प्रत्येक टी20 मालिका जिंकली आहे. अशात या मालिकेत तो पुनरागमन करण्याचाही प्रयत्न करेल. दुसरीकडे, न्यूझीलंडचे नेतृत्व मिचेल सँटनर याच्या हातात आहे. मागील सामन्यात सँटनरने कर्णधारपदासोबतच चांगली गोलंदाजीही केली होती.
भारत विरुद्ध न्यूझीलंड आमने-सामने आकडेवारी
भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात एकूण 23 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी 10 सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. तसेच, न्यूझीलंड संघानेही 10 सामने जिंकले आहेत, तर 3 सामने बरोबरीत सुटले आहेत. भारतामध्ये दोन्ही संघ 9 वेळा आमने-सामने आले आहेत. त्यात 5 सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे, तर न्यूझीलंडला चार सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. दोन्ही संघ पहिल्यांदाच लखनऊच्या इकाना स्टेडिअम येथे भिडणार आहेत.
दुसऱ्या टी20 सामन्याविषयी सर्वकाही-
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील दुसरा टी20 सामना कधी खेळला जाईल?
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील दुसरा टी20 सामना रविवारी (दि. 29 जानेवारी) खेळला जाणार आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील दुसरा टी20 सामना कुठे खेळला जाईल?
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील दुसरा टी20 सामना लखनऊ येथील इकाना स्टेडिअम येथे खेळला जाईल.
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील दुसरा टी20 सामना किती वाजता सुरू होईल?
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील दुसरा टी20 सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. तसेच, उभय संघात 6.30 वाजता नाणेफेक होईल.
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील दुसरा टी20 सामना कोणत्या टीव्ही चॅनेलवर प्रसारित होईल?
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील टी20 मालिकेच्या प्रसारणचे हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. त्यामुळे हे भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील सामने स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह इतर अनेक भाषांमध्ये समालोचनासह पाहू शकता.
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील दुसरा टी20 सामना फोन किंवा लॅपटॉपवर लाईव्ह कसा पाहता येईल?
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील दुसऱ्या टी20 सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग भारतात हॉटस्टार ऍपवर पाहता येईल.
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील दुसरा टी20 सामना मोफत कसा पाहता येईल?
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील दुसऱ्या टी20 सामन्याचे लाईव्ह प्रसारण डीडी फ्री डिशवर डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर पाहू शकता. यासाठी कोणतेही शुल्क मोजण्याची गरज नाही. (ind vs nz 2nd t20i 2023 live streaming telecast channel where how to watch know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ICC U19 Womens T20 Final: कुठे, कधी आणि कशी पाहता येईल भारत-इंग्लंड संघातील फायनल? जाणून घ्याच
आईने शेती आणि दूध विकून वाढवले, आता इंग्लंडविरुद्ध विश्वचषक फायनल खेळणार भारताची ‘ही’ युवा खेळाडू