कालपासून (29 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात (NZVsIND) हेगली ओव्हल स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना (2nd Test Match) सुरु झाला आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडविरुद्ध भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन केले.
मात्र, भारतीय फलंदाजांना त्यांच्या दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करता आली नाही. पण यासाठी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) कुणालाही दोष देऊ इच्छित नाही.
आज (1 मार्च) दुसऱ्या दिवसाखेर बुमराह आणि मोहम्मद शमीने (Mohammed Shami) मिळून न्यूझीलंडच्या पहिल्या डावात 7 विकेट्स घेतल्या आणि न्यूझीलंडला 235 धावांवर सर्वबाद करण्यात मोलाचा वाटा उचलला.
पण, यानंतर भारताने दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसाखेर 90 धावा घेत 6 विकेट्स गमावल्या. त्यामुळे आता भारतीय संघावर पराभवाचे सावट आहे. भारत न्यूझीलंडपेक्षा पहिल्या डावात घेतलेल्या 7 धावांच्या आघाडीमुळे सध्या अवघ्या 97 धावांनी पुढे आहे.
याबद्दल दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर बुमराह म्हणाला की, “गोलंदाजी युनिट म्हणून आम्ही विकेट घेण्यासाठी अनेक संधी उपलब्ध केल्या होत्या. आमची ही कामगिरी सातत्याने चालू असेल. आम्ही विरोधी संघावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू. तसेच, मी माझ्या कामगिरीमुळे आनंदी आहे. माझ्याकडून लांब स्पेल टाकण्याची अपेक्षा होती आणि मी ती पूर्ण केली आहे.”
वरच्या फळीतील फलंदाजांच्या खराब कामगिरीचा बचाव करत बुमराह म्हणाला, “मला कुणालाही यासाठी दोषी ठरवायचे नाही. संघाच्या संस्कृतीनुसार आम्ही संघातील कुणालाही दोष देण्याचा प्रयत्न करत नाही. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज चांगले खेळतात. जेव्हा आम्ही एकही विकेट घेऊ शकत नाही तेव्हा फलंदाज आमच्यावर टीका करत नाहीत. त्यामुळे मी कोणत्याही फलंदाजावर टीका करणार नाही.”
बुमराहला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत चांगले गोलंदाजी प्रदर्शन करता आले नव्हते. भारताने ती मालिका 0-3ने गमावली होती. यासंदर्भात बोलताना बुमराह म्हणाला की, “मी माझ्या व्यक्तीगत प्रदर्शनाकडे जास्त लक्ष देत नाही. प्रत्येक गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करायची असते. प्रत्येकाला दबाव निर्माण करायचा असतो. कधी मला विकेट मिळते तर कधी मिळत नाही. मी संघाच्या माझ्याकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण करण्यावर भर देतो.”
हा दिग्गज म्हणतो, टीम इंडियाला महान होण्यासाठी करावी लागले ही गोष्ट
वाचा????https://t.co/7Szrc4lu9P????#म #मराठी #cricket #TeamIndia #INDvsNZ— Maha Sports (@Maha_Sports) March 1, 2020
केन विलियम्सनला बाद केल्यानंतर विराट कोहलीने केले 'असे' सेलिब्रेशन, पहा व्हिडिओ
वाचा????https://t.co/fdpK4xKs95????#म #मराठी #cricket #TeamIndia #INDvsNZ— Maha Sports (@Maha_Sports) March 1, 2020






