भारत आणि बांग्लादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचे यजमानपद भूषवणार आहे. या कसोटी मालिकेला 16 ऑक्टोबरपासून बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरुवात होईल. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या संघात बहुतांश जुन्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. पण काही खेळाडू असे आहेत ज्यांच्याकडे बीसीसीआयने दुर्लक्षित केले आहे. यातील काही खेळाडू गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. या बातमीद्वारे आम्ही अशा तीन प्रमुख खेळाडूंचा उल्लेख करणार आहोत. ज्यांची न्यूझीलंड मालिकेत निवड झाली नाही.
3. मुकेश कुमार
उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने फेब्रुवारी 2024 मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर त्याला कसोटी संघात संधी मिळालेली नाही. मात्र, कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अलीकडेच त्याची दुलीप ट्रॉफी आणि इराणी चषक स्पर्धेत चांगली कामगिरी झाली होती. कदाचित त्याला न्यूझीलंड मालिकेत खेळण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही.
2. ऋतुराज गायकवाड
ऋतुराज गायकवाडने अद्याप कसोटीत पदार्पण केलेले नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रचंड शानदार आकडेवारी असूनही या प्रतिभावान खेळाडूकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. गायकवाडने अलीकडेच दुलीप स्पर्धेत फलंदाजीत चमकदार कामगिरी केली होती. तसेच त्याचे कर्णधारपदही वाखाणण्याजोगे होते. गायकवाडने आतापर्यंत खेळलेल्या 33 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 42.25 च्या सरासरीने 2282 धावा केल्या आहेत. ज्यात 6 शतके आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे.
1. अभिमन्यू ईश्वरन
देशांतर्गत क्रिकेटमध्ये सरफराज खानप्रमाणे भरघोस धावा करणाऱ्या अभिमन्यू ईश्वरनकडेही दुर्लक्ष झाले आहे. हा 29 वर्षीय फलंदाज सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये दोन शतके झळकावल्यानंतर त्याने इराणी ट्रॉफीमध्येही 191 धावांची शानदार खेळी खेळली होती. ईश्वरनने आतापर्यंत खेळलेल्या 98 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 7506 धावा केल्या आहेत.
हेही वाचा-
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधार कोण? बीसीसीआयने स्पष्टचं दिले संकेत
बीसीसीआयने या खेळाडूकडे पुन्हा पाठ फिरवली, शानदार फाॅर्म असताना देखील न्यूझीलंड मालिकेसाठी दुर्लक्षित
हाँगकाँग सिक्सेस सपर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा, माजी सलामीवीर कर्णधाराच्या भूमिकेत