पुण्यातील एमसीए स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडकडून 113 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयामुळे किवी संघाने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. भारताला दुसऱ्या डावात विजयासाठी 359 धावा करायच्या होत्या. पण संपूर्ण संघ 245 धावांत गडगडला. या पराभवानंतर रोहित शर्मा पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाला की, ‘मालिका गमावल्यानंतर आपल्या संघाला कमी लेखता येणार नाही. टीम इंडिया पुढील मालिकेत पुनरागमन करेल,’ असा आशावाद भारतीय कर्णधाराने व्यक्त केला.
मात्र, यावेळी त्याने एक कमेंट केली जी चाहत्यांना अजिबात आवडली नाही. परिषदेत तो म्हणाले की 12 वर्षांत एक मालिका गमावण्याची परवानगी दिली जाऊ शकते. यासोबतच तो फलंदाजांचे संरक्षण करताना दिसला.
रोहित शर्मा म्हणाला, आम्हाला 12 वर्षांतून एकदा तरी परवानगी द्या. याआधी आमची फलंदाजी अशी असती तर कदाचित आम्ही 12 वर्षे सलग विजय मिळवू शकलो नसतो. भारतात, आम्ही कोणताही सामना खेळू, आम्हाला जिंकायचे आहे. अशी अपेक्षा आहे. ती सवय आम्ही जोपासली आहे. यात तुमचा दोष नाही, भारतीय संघ इतका चांगला क्रिकेट खेळला आहे, त्यामुळे त्या अपेक्षांची पातळी वाढली आहे.
12 वर्षांत एकदाही हरल्याबद्दल रोहितची टिप्पणी अनेक चाहत्यांना आवडली नाही. आणि म्हणूनच चाहते सोशल मीडियावर भारतीय कर्णधारावर टीका करत आहेत.
12 saal mein isne kitne match khele wo bhi dekho
— N (@filtered_heart) October 26, 2024
“12 saal mai ek baar toh allowed hai yaar” 😭
“Ye aadat humne hi banayi hai 12 saal mai”
You’ve lost 4 tests in last 11 home Test Matches 😭😭 @ImRo45 have some shame pic.twitter.com/ym3RWn5mwW
— Gaurav (@Melbourne__82) October 26, 2024
Shameless captain. Retire ASAP. It’s already more than 12 yrs since you’ve playing..
— Sapper (@Sarcasmicrish) October 26, 2024
हेही वाचा-
कर्णधार रोहितच्या नावावर लाजिरवाणा विक्रम, घरच्या मैदानावर कसोटी गमावण्यात धोनीलाही टाकले मागे
‘थाला’प्रेमींसाठी आनंदाची बातमी! आयपीएल 2025 मध्ये खेळताना दिसणार धोनी
कसोटी मालिका गमावल्यानंतरही रोहितला नाही डब्ल्यूटीसी फायनलची चिंता! दिली अशी प्रतिक्रिया