न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी विराट कोहली मुंबईहून बेंगळुरूला रवाना झाला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. मालिकेतील पहिला सामना तीन दिवसांनी म्हणजेच 16 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. ज्यासाठी किंग कोहली सज्ज दिसत आहे.
सध्या सोशमीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कोहली मुंबईहून बेंगळुरूला जाण्यासाठी विमानतळावर दिसत आहे. यादरम्यान कोहली खूपच स्टनिंग लूकमध्ये दिसत आहे. यापूर्वी कोहली बांग्लादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दिसला होता.
Virat Kohli on his way to Bengaluru from Mumbai for New Zealand Test series. 🇮🇳
– The King returns to his kingdom.pic.twitter.com/Kg3D4gw8zd
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 13, 2024
बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये कोहलीला फारशी कामगिरी करता आली नाही. चेन्नईत खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत त्याने 06 आणि 17 धावा केल्या. त्यानंतर कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत कोहलीने 47 आणि 29* धावांची खेळी केली.
न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतील पहिला कसोटी सामना 16 ते 20 ऑक्टोबर दरम्यान बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. त्यानंतर मालिकेतील दुसरी कसोटी 24 ते 28 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, पुणे येथे होणार आहे. या मालिकेतील तिसरी आणि शेवटची कसोटी 01 ते 05 नोव्हेंबर दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवली जाणार आहे.
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप
कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड संघ
टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल (फक्त पहिली कसोटी), मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, विल ओ’रुर्के, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, बेन सीयर्स, ईश सोधी (केवळ दुसरी आणि तिसरी कसोटी), टीम साऊदी, केन विल्यमसन, विल यंग
हेही वाचा-
भारताचे वर्ल्ड कप विजेते प्रशिक्षक मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, संघानं दिली मोठी जबाबदारी
या गोलंदाजासमोर बुमराह-शमी देखील फेल, बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात चमकदार कामगिरी
ind vs ban; टीम इंडियाने टी20 मलिका गाजवली; पाकिस्तानचा हा विक्रम मोडीत