न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने शनिवारी भारतीय भूमीवर आपल्या पहिल्या कसोटी मालिका विजयामुळे खुपच आनंददीत पाहायला मिळाला. न्यूझीलंडने शनिवारी दुसऱ्या कसोटीत भारताचा 113 धावांनी पराभव करून मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. बंगळुरू येथील पहिल्या कसोटीत भारताचा आठ विकेट्सनी पराभव झाला. यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यातील पराभवामुळे गेल्या 18 मालिकेतील अपराजित राहण्याचा सिलसिलाही खंडित झाला.
न्यूझीलंडच्या विजयानंतर लॅथमने पत्रकारांना सांगितले की, आम्ही भारतावर वर्चस्व गाजवण्याची शैली स्वीकारली. त्यांना सुरुवातीलाच धक्का देण्यात आम्ही यशस्वी झालो. याशिवाय नाणेफेकीचा निर्णयही आमच्या बाजूने गेला. “त्याने आमच्यासाठी खरोखर एक महत्त्वाची भूमिका बजावली.”
तो म्हणाला, “आम्हाला त्यांच्यासमोर (भारत) खडतर आव्हान द्यायचे होते आणि त्यांना सुरुवातीला धक्का द्यायचा होता. ज्यात आम्ही यशस्वी झालो. आम्ही फलंदाजीतही चांगली कामगिरी केली. जी खरोखरच महत्त्वाची होती. आमचे गोलंदाज चांगले खेळले. त्यांचा असा परफॉर्मन्स पाहणे खूप छान वाटले.”
2016 आणि 2021 च्या भारत दौऱ्यात न्यूझीलंड संघाचा भाग असलेल्या लॅथमने सांगितले की, संघाच्या यशात नाणेफेकीचाही मोठा वाटा होता. पहिल्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली होती. पण फलंदाजी करताना त्यांचा संघ केवळ 46 धावांवर बाद झाला होता. दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा लॅथमचा निर्णय यशस्वी ठरला.
तो म्हणाला, “नाणेफेकचा निर्णय आमच्या बाजूने होता. मला वाटतं इथे मी पहिल्यांदा नाणेफेक जिंकली. नाणेफेकीने आमच्या संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विशेषत: बेंगळुरूमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात.
दुसऱ्या कसोटीत मिचेल सँटनरने 13 विकेट घेत न्यूझीलंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आणि कर्णधारानेही त्याचे खूप कौतुक केले.
लॅथम म्हणाला, “मिच (सँटनर) बराच काळ चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. तो बऱ्याच काळापासून आमच्या क्रिकेट संघाचा भाग आहे आणि आम्हाला माहित आहे की तो किती उपयुक्त गोलंदाज आहे. त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्याबद्दल संघाला त्याचा अभिमान वाटतो.”
हेही वाचा-
लाजिरवाण्या पराभवानंतर टीम मॅनेजमेंट ॲक्शन मोडवर, वानखेडे कसोटीपूर्वी घेतला हा मोठा निर्णय!
हा खेळाडू होऊ शकतो पाकिस्तानचा नवा कर्णधार, PCB लवकरच घेणार मोठा निर्णय!
टीम इंडियात प्रवेश करताच वेगवान गोलंदाजाने माजवली खळबळ, ऑस्ट्रेलियाआधी या संघावर बरसला






