कानपूर कसोटी सामना शेवटच्या दिवशी नाट्यमयरीत्या बरोबरीत सुटला. भारतीय संघाला शेवटची विकेट न मिळाल्याने सामन्याच्या निकालावर परिणाम झाला. रचिन रवींद्र आणि एजाज पटेल यांनी खेळपट्टीवर भारतीय फिरकी माऱ्याचा यशस्वी सामना केला. शेवटी खराब प्रकाशामुळे सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. या सामन्यानंतर भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
सामन्यानंतर बोलताना रहाणे म्हणाला की,: “मी माझ्या परीने प्रयत्न केला. हा खूप चांगला सामना ठरला. पहिल्या सत्रानंतर आम्ही चांगले पुनरागमन केले. आम्हाला साहा आणि अक्षर यांची भागीदारी पुढे न्यायची होती. आम्ही शेवटी ५-६ षटके टाकू पाहत होतो. पण आम्हाला ती भागीदारी उभारायची होती. मला वाटत नाही की आम्ही काही वेगळे करू शकलो असतो. पंचांशी संभाषण मैदानावरील प्रकाशाबाबत होत होते. अशावेळी क्षेत्ररक्षण संघ म्हणून, तुम्हाला अधिक षटके टाकायची असतात. मात्र, एक फलंदाजी संघ म्हणून तुम्हाला त्या स्थितीत फलंदाजी करायची नसते. माझ्यात आणि पंचांमध्ये मैदानावरील प्रकाशाबाबत संभाषण होत होते. परंतु, पंचांनी निर्णय घेतला आणि मला वाटले की ते बरोबर होते. मला वाटत होते की या खेळपट्टीवर फिरकीपटूंना अधिक स्पेल टाकता येतील.”
भारतीय कर्णधाराने असेही सांगितले की, “गोलंदाजांकडून आलटून पालटून गोलंदाजी करवून घेणे योग्य होते. त्यांनी खरोखर चांगली गोलंदाजी केली. मी श्रेयससाठी खूप आनंदी आहे. कसोटी पदार्पणासाठी त्याला बराच काळ वाट पाहावी लागली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी खूप चांगली आहे. विराट पुढील सामन्यात पुनरागमन करेल, हे मुंबईच्या सामन्यात पाहावे लागेल. संघ व्यवस्थापन याबाबत निर्णय घेईल, मी टिप्पणी करू इच्छित नाही.”
विशेष म्हणजे या कसोटी सामन्याच्या शेवटच्या अर्ध्या तासात भारतीय संघाला एका विकेटची गरज होती. रचिन रवींद्र आणि एजाज पटेल यांनी ५२ चेंडू खेळले आणि सामना अनिर्णित राहिला. भारतीय संघाला जिंकण्याची अधिक संधी होती पण दोघांनी ती होऊ दिली नाही.”