24 जानेवारीपासून भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 5 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र त्याआधी भारतीय संघाला जबरदस्त मोठा धक्का बसला आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून (Delhi) विदर्भाविरुद्ध (Vidarbha) खेळताना दुखापतग्रस्त झाला आहे.
दिल्लीकडून गोलंदाजी करताना विदर्भाच्या दुसऱ्या डावातील पाचव्या षटकात इशांतच्या पायाच्या घोट्याला दुखापत (Injury) झाली आहे.
त्यामुळे आता न्यूझीलंड दौऱ्यासाठी कसोटी संघातील त्याच्या स्थानाबाबत मोठा प्रश्न उभा राहिला आहे. अजून तरी न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झालेली नाही. मात्र आता कसोटी संघाची निवड करताना इशांतच्या दुखापतीचा देखील विचार करावा लागणार आहे.
“एमआरआयचा अहवाल आला आहे. सुदैवाने त्याला फ्रॅक्चर नाही. पण त्याच्या घोट्याला दुखापत आहे. ज्यावेळी तो चालण्याच्या स्थितीत असेल, तेव्हा तो एनसीएला (राष्ट्रीय क्रिकेट अकादमी) जाईल,” असे दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
इशांतला या दुखापतीतून सावरण्यासाठी साधारण 1 महिन्यापेक्षा जास्तीचा कालावधी लागणार आहे. एनसीएला गेल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा एकदा इशांतचे एमआरआय स्कॅन करण्यात येईल.
जेव्हा इशांतला ही दुखापत झाली तेव्हा त्याला खूप त्रास होत होता. त्यामुळे संघसहकाऱ्याच्या मदतीने मैदानाच्या बाहेर गेला. यानंतर त्याला लगेच वैद्यकीय मदत घ्यावी लागली.
इशांतने या सामन्यातील पहिल्या डावात 45 धावा देत 3 विकेट्स घेतले होते. रणजी ट्रॉफीच्या या सत्रातील हा त्याचा शेवटचा सामना होता. कारण न्यूझीलंड दौऱ्यावरील कसोटी संघातील त्याची निवड निश्चित मानली जात होती.
भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध 21 फेब्रुवारीपासून 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यामध्ये 21 ते 25 फेब्रुवारीदरम्यान पहिला तर 29 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान दुसरा कसोटी सामना होणार आहे. त्याआधी भारत आणि न्यूझीलंडमध्ये 24 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान टी20 तर 5 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान 3 सामन्यांची वनडे मालिका होणार आहे.
31 वर्षांचा वेगवान गोलंदाज इशांतने आतापर्यंत 96 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये 173 डावात 292 विकेट्स घेतले आहेत. तसेच 80 वनडे सामन्यात 115 विकेट्स घेतले आहेत.
आयसीसीने घातलेल्या बंदीबद्दल कागिसो रबाडा म्हणाला…
वाचा👉https://t.co/PEnmjpONyC👈#म #मराठी #Cricket #SAvENG @KagisoRabada25— Maha Sports (@Maha_Sports) January 21, 2020
टीम इंडियाला मोठा धक्का! हा मोठा खेळाडू न्यूझीलंड दौऱ्यातील टी२० मालिकेतून बाहेर
वाचा👉https://t.co/MvmF8ujdSS👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @SDhawan25— Maha Sports (@Maha_Sports) January 21, 2020