भारत दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंडने आतापर्यंत चांगला खेळ दाखवला असून पहिले दोन सामने जिंकून भारतीय भूमीवर पहिल्यांदाच लाल चेंडू क्रिकेटमध्ये मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. आता किवी संघ आजपासून (1 नोव्हेंबर) मुंबईत सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाशी भिडत आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पुण्याच्या विजयाचा हिरो असलेला मिचेल सँटनर या सामन्यात खेळत नाहीये. लॅथमने नाणेफेकीच्या वेळी ही माहिती दिली आणि डावखुरा फिरकी अष्टपैलू खेळाडू सामना का खेळत नाही हे देखील सांगितले.
पुण्यात दणदणीत विजय मिळवून न्यूझीलंडला मालिकेत अजेय आघाडी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा मिचेल सँटनर दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. दुसऱ्या कसोटीत अडचणीत असताना पण तरीही त्याने गोलंदाजी सुरूच ठेवली. मात्र, आता न्यूझीलंडने मालिका जिंकल्याने त्याला मुंबई कसोटीतून विश्रांती देण्यात आली आहे. कॅप्टन टॉम लॅथमने सांगितले की, सँटनरला साइड स्ट्रेनच्या काही समस्या आहेत आणि त्यामुळेच तो या सामन्यात खेळत नाही. त्याच्या जागी लेगस्पिनर ईश सोढीला संधी मिळाली आहे.
MITCHELL SANTNER IS NOT PLAYING TODAY. [Injury] pic.twitter.com/fc1HNXJaHc
— Johns. (@CricCrazyJohns) November 1, 2024
न्यूझीलंडने मिचेल सँटनरला बेंगळुरूमध्ये खेळवले नव्हते. परंतु पुण्यातील संथ वळणाची खेळपट्टी लक्षात घेता, मिचेल सँटनरला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळाले आणि त्याने आपली निवड पूर्णपणे योग्य असल्याचे सिद्ध केले. सँटनरने सामन्यात एकूण 13 बळी घेतले. ज्यात पहिल्या डावात 7 बळी आणि दुसऱ्या डावात 6 बळींचा समावेश होता. भारतीय फलंदाज सँटनरसमोर झुंजताना दिसले आणि विकेट गमावत राहिले. सँटनरने ज्या प्रकारे कामगिरी केली आहे, ते पाहता मुंबईत न्यूझीलंडला त्याची उणीव नक्कीच भासेल.
हेही वाचा-
जसप्रीत बुमराह तिसरी कसोटी का खेळत नाहीये? बीसीसीआयनं जारी केलं धक्कादायक अपडेट
रिटेन्शनंतर कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक? या संघाच्या खात्यात 110 कोटींहून अधिक
IND VS NZ; न्यूझीलंडचा टाॅस जिंकून फलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघाच्या प्लेइंग 11