हॅमिल्टन | भारत विरुद्ध न्यूझीलंड चौथा वनडे सामना उद्या 31 जानेवारीपासून हॅमिल्टन येथे सुरु होत आहे. भारतीय संघ या मालिकेत 3-0 असा विजयी आघाडीवर आहे.
तिसऱ्या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक एमएस धोनीला हॅमस्ट्रिंगचा त्रास झाल्याने दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली होती.
धोनी आता या दुखापतीतून सावरला असल्याचे दिसून येत आहे. कारण त्याने आज (30 जानेवारी) संघसहकाऱ्यांसोबत नेटमध्ये सराव केला. यावरून तो उद्याच्या चौथ्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे.
धोनीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सलग तीन अर्धशतके करत चमकदार कामगिरी केली होती. तोच फॉर्म कायम ठेवत त्याने न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात नाबाद 48 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर यष्टीरक्षणातही उत्तम कामगिरी करत फलंदाजांना बाद केले होते.
📸📸
Snapshots from #TeamIndia's training session ahead of the 4th ODI against New Zealand #NZvIND pic.twitter.com/KTmYgLwK5n
— BCCI (@BCCI) January 30, 2019
या सामन्यात नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर युवा खेळाडू शुबमन गिल हा देखील या सामन्यात पदार्पण करू शकतो.
भारताने अगोदरच 5 वन-डे सामन्यांची ही मालिका 3-0ने जिंकली असून 10 वर्षानंतर न्यूझीलंडमध्ये वन-डे मालिका विजय नोंदवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–रोहितने जर ही गोष्ट केली तर ठरणार सर्वात लकी भारतीय
–या कारणामुळे टीम इंडिया आणि पाकिस्तान विश्वचषकात वेगळ्या ग्रुपमध्ये
–तब्बल १६ महिन्यांनी किंग कोहली ठरला या गोष्टीत दुर्दैवी