न्यूझीलंडचा पिरकीपटू अजाज पटेल याने शनिवार रोजी (०४ डिसेंबर) इतिहास रचला आहे. या एकट्या डावखुऱ्या गोलंदाजाने भारताच्या संपूर्ण संघाची दाणादण उडवत ३२५ धावांवर यजमानांचा पहिला डाव संपुष्टात आणला. यासह तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात १० विकेट्स घेणारा जगातील तिसरा आणि न्यूझीलंडचा केवळ पहिलाच गोलंदाज ठरला आहे. याच अजाजच्या सर्व १० विकेट्सचा व्हिडिओ एका चाहत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला चाहत्यांकडून भरपूर पसंती मिळताना दिसत आहे.
अजाजच्या ऐतिहासिक कामगिरीची सुरुवात झाली भारताच्या युवा सलामीवीरीच्या विकेटपासून. अजाजने सर्वप्रथम सलामीवीर शुबमन गिलला (४४ धावा) आपल्या जाळ्यात फसवले. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली अशा अनुभवी शिलेदारांना त्याने शून्यावर तंबूत धाडले. पुढे श्रेयस अय्यर (१८ धावा) त्याचा पहिल्या दिवसातील शेवटचा विकेट ठरला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वृद्धिमान साहा (२७ धावा) आणि आर अश्विन (० धावा) यांच्या त्याने एकाच षटकात सलग २ विकेट्स घेतल्या आणि इतिहास रचण्याकडे वाटचाल सुरू ठेवली.
पुढे भारताच्या आघाडीच्या ६ फलंदाजांना बाद केल्यानंतर त्याचा सर्वात मोठा बळी ठरला, भारताचा दीडशतकवीर मयंक अगरवाल. टॉम ब्लंडलच्या हातून त्याने १५० धावांवर खेळत असलेल्या अजाजला झेलबाद केले. पुढे मैदानावर तळ ठोकलेल्या अष्टपैलू अक्षर पटेललाही त्याने अर्धशतकी खेळी केल्यानंतर आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर रचिन रविंद्रच्या मदतीने खालच्या फळीतील जयंत यादव आणि मोहम्मद सिराज यांनाही पव्हेलियनला पाठवत त्याने १० विकेट्स पूर्ण केल्या.
यासह त्याने अनिल कुंबळे आणि जिम लेकर यांच्या क्लबमध्ये उडी घेतली आहे. कुंबळे आणि लेकर यांनीही कसोटी सामन्याच्या एका डावात १० विकेट्स चटकावण्याची उल्लेखनीय कामगिरी केली होती.
https://twitter.com/Captainjack567/status/1467042106397110272?s=20
यानंतर अजाजच्या या अविश्वसनीय आणि अद्भुत अशा १० विकेट्सचा व्हिडिओ एका चाहत्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्याच्या या व्हिडिओला जवळपास २४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. तसेच या व्हिडिओला २००० च्या वरती लाईक्सही मिळाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
२१ व्या शतकातील पहिला ‘परफेक्ट टेन’ घेणारा देबाशिष मोहंती विस्मृतीत गेलाय