वनडे क्रिकेटमध्ये संघाच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याची कामगिरी भारतीय संघाने केली आहे. भारताने हा मान मंगळवारी (दि. 24 जानेवारी) न्यूझीलंडला तिसऱ्या वनडेत धूळ चारल्यानंतर मिळवला आहे. होळकर क्रिकेट स्टेडिअम, इंदोर येथे पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने 90 धावांच्या फरकाने विजय मिळवला. तसेच, मालिकाही 3-0ने खिशात घातली. या सामन्यात पराभूत झाल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम हा भलताच निराश झाला. त्याने यावेळी पराभवाचे खापर कुणावर फोडले जाणून घेऊया…
भारताचे आव्हान पार करण्यात न्यूझीलंड अपयशी
भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 9 विकेट्स गमावत 385 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडला विजयासाठी 386 धावा करण्याची गरज होती. मात्र, पाहुण्या संघाचा डाव 41.2 षटकात 295 धावांवरच संपुष्टात आला. त्यामुळे भारताने हा सामना 90 धावांनी खिशात घातला.
Well played India! A 3-0 series win. The T20 Series starts on Friday. Devon Conway leading the chase with 138 from 100 balls. Scorecard | https://t.co/B5glESfZra #INDvNZ ???? = BCCI pic.twitter.com/li2dHeWula
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 24, 2023
काय म्हणाला टॉम लॅथम?
सामन्यासोबतच मालिकाही गमावल्यानंतर टॉम लॅथम (Tom Latham) खूपच निराश झाला. खरं तर केन विलियम्सन (Kane Williamson) याच्या अनुपस्थितीत लॅथमकडे न्यूझीलंडचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. मात्र, नेतृत्वात तो सपशेल फ्लॉप ठरला. भारताविरुद्ध 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याला न्यूझीलंडला एकही सामना जिंकून देता आला नाही.
सामन्यात स्वत: शून्य धावेवर बाद होणाऱ्या लॅथम याने तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेतील पराभवाचे खापर खराब गोलंदाजीवर फोडले. तो म्हणाला की, “आम्ही योग्य गोलंदाजी केली नाही. त्यामुळे भारताने फलकावर जास्त धावा उभ्या केल्या. आम्ही सामन्यात पुनरागमन केले होते. मात्र, आम्ही पुन्हा विकेट्स गमावले. त्यामुळे आम्ही पराभवाच्या दरीत ढकललो गेलो. विश्वचषकापूर्वी आमचा भारतात खेळण्याचा अनुभव खूपच चांगला राहिला. आम्हाला या पराभवातून चांगला धडा मिळेल.”
तिसऱ्या वनडेत डेवॉन कॉनवेचा धमाका
न्यूझीलंडचा फलंदाज डेवॉन कॉनवे याने भारतीय संघाविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात शानदार शतक झळकावले. हे त्याच्या वनडे कारकीर्दीतील तिसरे शतक ठरले. हे शतक त्याने 71 चेंडूत ठोकले. विशेष म्हणजे, त्याने 100 चेंडूंचा सामना करताना 138च्या स्ट्राईक रेटने 138 धावा केल्या. या धावा करताना त्याने 8 षटकार आणि 12 चौकारांचाही पाऊस पाडला.
विशेष म्हणजे, पहिल्या दोन वनडे सामन्यातील पराभवानंतर न्यूझीलंड संघ संघर्ष करताना दिसत होता. मात्र, कॉनवेने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले आणि संघाची स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न केला. कॉनवेव्यतिरिक्त हेन्री निकोलस (42) आणि मिचेल सँटनर (34) यांनीही धावसंख्या वाढवण्यात योगदान दिले. ( ind vs nz odi series 2023 captain tom latham reaction after team india won)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाच्या माॅडर्न एराची भिंत, चेतेश्वर पुजारा! अडीच वर्षांचा असतानाच वडिलांच्या लक्षात आलेले कौशल्य
न्यूझीलंडला वनडेत व्हाईट वॉश देताच रोहितची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘प्रामाणिकपणे सांगतो आम्ही…’






