---Advertisement---

IND vs NZ: पहिल्याच कसोटी सामन्यावर पावसाचं सावट! पाहा हवामान अंदाज

---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 16 ऑक्टोबरपासून बेंगळुरू येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ पूर्णपणे सज्ज झाले आहेत. मात्र, या सामन्यावर मोठा धोका निर्माण झाला आहे. बेंगळुरूमध्ये 16 ते 18 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या कसोटी सामन्यावर मोठा धोका निर्माण झाला आहे.
बेंगळुरूमध्ये पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे

गेल्या दोन दिवसांपासून बेंगळुरूमध्ये पाऊस पडत आहे. याशिवाय येत्या काही दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या मते, पुढील एक आठवडा बेंगळुरूमध्ये पाऊस पडू शकतो. तर हवामान खात्यानुसार 16 आणि 17 ऑक्टोबरला मुसळधार पाऊस पडू शकतो. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 16 ऑक्टोबरपासून खेळवला जाणार असून, जर पाऊस पडला तर त्याचा थेट परिणाम सामन्यावर होणार आहे. चिन्नास्वामी मैदानाची ड्रेनेज व्यवस्था चांगली असली तरी सतत पाऊस पडल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते.

पहिल्या दिवशीचा हवामानाचा अंदाज पाहता खेळ उशिरा सुरू होऊ शकतो. असे म्हण्यात येईल. उद्या सकाळी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही हीच परिस्थिती राहणार आहे. खेळाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी दोन तास पाऊस पडण्याची शक्यता आहे. असे झाल्यास दुसऱ्या दिवशीच्या खेळावरही मोठा परिणाम होईल.

ढगाळ वातावरणामुळे टीम इंडिया या सामन्यात तीन वेगवान गोलंदाजांसह उतरू शकते. या मालिकेसाठी भारतीय संघाने मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि जसप्रीत बुमराह या तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश केला आहे. बातम्यांनुसार, या तिन्ही वेगवान गोलंदाजांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. भारतीय संघ नुकतीच बांग्लादेशविरुद्ध जी कामगिरी केली, तीच कामगिरी न्यूझीलंड कसोटी मालिकेतही करण्यासाठी मैदानात उतरेल.

हेही वाचा-

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटीत कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड
ind vs nz; पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन, 3 फिरकीपटूंना स्थान?
पाकिस्तानच्या पराभवामुळे टीम इंडिया बाहेर, जाणून घ्या सेमीफायनलमध्ये कोणचा प्रवेश

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---