---Advertisement---

सूर्याचे 4 सिक्स अन् विराटचा रेकॉर्ड उद्धवस्त, रोहित अव्वल स्थानावर कायम

On: रविवार, जानेवारी 25, 2026 3:22 PM
---Advertisement---

भारताचा टी२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला अखेर फलंदाजीत सूर गवसला आहे. त्याने शुक्रवारी (२३ जानेवारी) झालेल्या सामन्यात धमाकेदार नाबाद अर्धशतकी खेळी केली. रायपूर येथे झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या त्या टी२० सामन्यात सूर्यकुमारने लक्ष्याचा पाठलाग करताना ४ षटकार खेचले. याबरोबरच त्याने विराट कोहलीचा विक्रम मागे टाकला.

सूर्यकुमार टी२०मध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. तो या यादीत दुसऱ्या स्थानावर आला असून पहिल्या स्थानावर रोहित शर्मा आहे. तसेच रोहित-सूर्यकुमारमध्ये २० षटकारांचे अंतर आहे.

सूर्यकुमारने भारतासाठी लक्ष्याचा पाठलाग करताना ३६ डावांमध्ये ५४ षटकार मारले आहेत. विराटने ४८ डावांमध्ये ५३ षटकार मारले आहेत. रोहितने ७४ षटकार मारले आहेत. या यादीत केएल राहुल ४० षटकारांसह चौथ्या आणि माजी अष्टपैलू युवराज सिंग ३१ षटकारांसह पाचव्या स्थानी आहे.

विशेष म्हणजे सूर्यकुमार जेव्हा नाबाद राहिला तेव्हा संघ जिंकला आहे. तो आतापर्यंत ९ वेळा नाबाद राहिला असून ते सर्व सामना भारताने जिंकले आहेत. तसेच शिवम दुबेही ९ वेळा नाबाद राहिला आहे. या यादीत विराट अव्वल असून तो टी२० क्रिकेटमध्ये १८ वेळा लक्ष्याचा पाठलाग करताना नाबाद राहिला. या सर्व सामन्यात भारत अजिंक्य राहिला होता. यामुळेच तर त्याला चेजमास्टर हे टोपणनाव पडले.

सूर्यकुमारने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात इशान किशन आणि दुबे यांच्यासोबत महत्वाच्या भागीदारी केल्या. त्याने किशनसोबत तिसऱ्या विकेटसाठी ४८ चेंडूत १२२ धावांची आणि दुबेसोबत चौथ्या विकेटसाठी ३७ चेंडूत ८१ धावांची भागीदारी केली. त्याने यावेळी ३७ चेंडूत नाबाद ८१ धावा केल्या. यामध्ये ९ चौकारांचाही समावेश आहे.

भारत या टी२० मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकला आहे. त्याने यजमानांनी ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. दोन्ही संघ तिसऱ्या सामन्यासाठी रविवारी (२५ जानेवारी) गुवाहाटी येथे समोरा-समोर येणार आहेत. हा सामना जिंकत मालिका खिशात घालण्याच्या प्रयत्नात भारत असणार असून न्यूझीलंड मालिकेतील पहिल्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---