भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आधीच सुरुवात झाली आहे. ज्यामध्ये पहिला कसोटी सामना 16 ऑक्टोबरपासून बेंगळुरू एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय संघ पहिल्या डावात पूर्णपणे फ्लाॅप ठरला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाने शानदार पुनरागमन केले. ज्यामध्ये सर्फराज खानने मोठे योगदान दिले आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक न्यूझीलंडविरुद्ध झळकावले आहे.
दुसऱ्या डावात टीम इंडियाची दुसरी विकेट रोहित शर्माच्या रूपाने गमवावी लागली. त्यानंतर सर्फराज खान चौथ्या क्रमांकावर क्रीझवर आला. तिसऱ्या विकेटसाठी सर्फराजने विराट कोहलीसोबत 163 चेंडूत 136 धावांची भागीदारी केली. विराट कोहली बाद झाल्यानंतर त्याने रिषभ पंतसोबत खेळी सुरू ठेवली.
सर्फराज खानने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक 110 चेंडूत झळकावले. टीम साऊथीच्या चेंडूवर चौकार मारून त्याने 56.3 षटकांत हे शतक पूर्ण केले. पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर सर्फराज खानने उत्कृष्ट खेळ करत भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करण्यात मोठी भूमिका बजावली. या बातमी आखेरीस भारत 318-3 अश्या स्थितीत आहे.
Maiden Test 💯! 👏 👏
What a cracker of a knock this is from Sarfaraz Khan! ⚡️⚡️
Live ▶️ https://t.co/8qhNBrrtDF#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/UTFlUCJOuZ
— BCCI (@BCCI) October 19, 2024
सर्फराज खानने 15 फेब्रुवारी 2024 रोजी इंग्लंडविरुद्ध त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्याने आतापर्यंत 3 कसोटी सामने खेळले आहेत. तिन्ही कसोटी सामने इंग्लंडविरुद्ध आहेत. या तीन कसोटी सामन्यांमध्ये सर्फराजने 79.36 च्या स्ट्राईक रेटने 200 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
सर्फराज खानने आतापर्यंत 51 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्याने 51 सामन्यात 70.75 च्या स्ट्राईक रेटने 4422 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 14 शतके आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. सर्फराज खानची प्रथम श्रेणीतील सर्वोच्च धावसंख्या नाबाद 301 धावा आहे.
हेही वाचा-
पाकिस्तान संघाला मिळाला नवा कर्णधार! हा खेळाडू घेणार बाबर आझमची जागा
ऋतुराज गायकवाड होणार कर्णधार! ईशान किशनचेही नशीब चमकणार; AUS दौऱ्याबाबत मोठे अपडेट
IND vs NZ; कसोटीच्या चौथ्या दिवशी पावसाची शक्यता! टीम इंडियाच्या अडचणीत वाढ?