न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंड संघाने 7 विकेट्सने आपल्या खिशात घातला. तसेच, मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. यानंतर आता भारतीय संघ रविवारी (दि. 27 नोव्हेंबर) हॅमिल्टन येथे दुसऱ्या वनडेत न्यूझीलंडचा सामना करेल. हा सामना भारतासाठी ‘करो वा मरो’ सामना असेल. हा सामना भारतीय संघ कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचा प्रयत्न करेल. मात्र, या सामन्यावर पाऊस पाणी फेरू शकतो.
कसे असेल वातावरण?
खरं तर, हॅमिल्टन (Hamilton) येथे रविवारी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. एका रिपोर्टनुसार, हॅमिल्टनमध्ये 91 टक्के ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे आणि जवळपास 4 तास पाऊस पडू शकतो. अशात षटके कमी केली जाऊ शकतात. तसं पाहिलं, तर स्टेडिअमची ड्रेनेज सिस्टीम उच्च दर्जाची आहे. त्यामुळे पावसानंतर लगेच खेळ सुरू होण्याची पूर्ण शक्यता आहे. या सामन्यातील तापमानाविषयी बोलायचं झालं, तर 16 ते 18 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यात पावसाचा रोडा
भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा व्यवस्थित पार पडत नसल्याचे दिसत आहे. या दौऱ्यातील पहिल्या टी20 सामन्यात पावसाचे पाणी फेरले होते. त्यानंतर दुसरा सामना व्यवस्थित पार पडला. मात्र, तिसऱ्या सामन्यात पावसामुळे डकवर्थ लुईस नियमाच्या आधारावर सामना बरोबरीत सुटला. फक्त दुसरा सामना पावसामुळे वाचला. हा सामना भारताने जिंकत मालिका 1-0ने आपल्या नावावर केली होती. (ind vs nz second odi hamilton weather report)
वनडे सामन्यासाठी दोन्ही संघ
भारत
शिखर धवन (कर्णधार), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), दीपक हुड्डा, शाहबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, दीपक चाहर, अर्शदीप सिंग, शार्दुल ठाकूर आणि उमरान मलिक.
न्यूझीलंड
केन विलियम्सन (कर्णधार), फिन ऍलेन, डेवॉन कॉनवे, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, टीम साऊदी, मॅट हेन्री, ऍडम मिल्ने, जिमी नीशम, मिचेल सँटनर आणि लॉकी फर्ग्युसन.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जगभरातील गोलंदाजांमध्ये सूर्याने घेतले ‘या’ पाकिस्तानी दिग्गजाचे नाव, वाचा कोण आहे तो खेळाडू
‘हा’ खेळाडू भारताचा आक्रमक कर्णधार होऊ शकतो, गौतम गंभीर याने केली भविष्यवाणी





