भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सध्या टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेत सध्या भारत १-० अशा आघाडीवर आहे. शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) मालिकेतील दुसरा सामना रांचीमध्ये जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्स याठिकाणी खेळला जाणार आहे. हा सामना जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे. दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला तर भारत मालिकेत विजयी आघाडी घेईल. तत्पूर्वी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने पाच विकेट्स राखून विजय मिळवला होता.
दोन्ही संघांमध्ये शुक्रवारी रात्री ७ वाजता दुसऱ्या सामन्याची सुरुवात होणार आहे. सामन्यादरम्यान मैदानावर दव पडण्याची शक्यता आहे.
रांचीतील जेएससीएस स्टेडियमचे मुख्य पिच क्यूरेटर श्याम बहादुर सिंग यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले आहे की, रात्री सात वाजल्याच्या नंतर खूप दव पडण्याची शक्यता आहे. दव पडल्यामुळे सामन्यात नाणेफेक महत्वाची भूमिका पार पाडेल. शक्यतो ही फलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टी आहे, ज्याचा वापर यापूर्वी जुलै महिन्यात केला गेला होता. त्यावेळी या मैदानावर झारखंड प्रदेश टी२० स्पर्धा खेळली गेली होती.
जेएससीएस स्टेडियममध्ये एका वेळी ३९००० प्रेक्षक सामना पाहण्यासाठी उपस्थित राहू शकतात. शुक्रवारच्या सामन्याची तिकिटे ९०० ते ९००० रुपयांदरम्यान होते आणि ही तिकिटे ऑनलाइन पद्धतीने विकली गेली आहेत. झारखंड प्रदेश क्रिकेट संघाचे सचिव संजय सहाय यांनी सांगितले की, राज्य सरकारकडून १०० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर त्यांना संपूर्ण स्टेडियम भरलेले असेल याची अपेक्षा आहे. राज्य सरकारच्या निर्बंधांप्रमाणे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या किंवा आरटी पीसीआरचा चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असलेले प्रेक्षक स्टेडियममध्ये प्रवेश करू शकणार आहेत.
भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, केएल राहुल, रिषभ पंत, ईशान किशन, युजवेंद्र चहल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड संघ – मार्टिन गप्टिल, मार्क चॅपमन, जेम्स निशम, टॉड एश्ले, डेरिल मिचेल, मिचेल सॅटरनर, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्यूसन, ईश सोढी, टिम साउदी (कर्णधार), एडम मिल्ने.
महत्त्वाच्या बातम्या –
आणि एबी डिविलियर्सचे ते स्वप्न अखेर अपुर्णच राहिलं!
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या टी२० सामन्यासाठी ‘महा ड्रीम ११’; हे खेळाडू करुन देऊ शकतात पैसा वसूल!