---Advertisement---

INDvsNZ: सामना जिंकूनही चाहते हेड कोच गौतम गंभीरवर नाराज, जाणून घ्या कारण

On: गुरूवार, जानेवारी 22, 2026 1:15 PM
---Advertisement---

भारताने न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका गमावल्याने भारतीय चाहते खेळाडू आणि संघ प्रशिक्षकांवर चांगलेच भडकले होते. आता भारताने टी२० मालिकेची सुरूवात विजयाने केली तरीही चाहत्यांची नाराजी काही कमी झालेली नाही. त्याला कारणीभूत भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आहेत.

न्यूझीलंड विरुद्धच्या विजयानंतर कॉंग्रेस खासदार शशि थरूर यांनी गंभीरचे एक्स या सोशल मीडियावरून अभिनंदन केले. त्यानंतर गंभीरनेही त्याला प्रतिक्रिया दिली असून त्याच्या या प्रतिक्रियेवरच चाहते नाराज झाले आहेत.

थरूर यांनी एक्सवर गंभीरसोबत फोटो पोस्ट करत म्हटले, “नागपूरमध्ये गौतम गंभीरला भेटून आनंद झाला. प्रधानमंत्री मोदीनंतर तो भारतासाठी सर्वात कठीण काम करत आहे. लाखो लोक रोज त्याच्या निर्णयावर प्रश्न निर्माण करतात, मात्र ते शांत राहिले आणि घाबरले नाहीत. त्यांचा हा स्वभाव कौतुकाास्पद आहे.” याला गंभीरनेही उत्तर दिले आहे.

गंभीर म्हणाला, ” धन्यवाद. जोपर्यंत सगळा गोंधळ शांत होईल तेव्हा सगळ्यांंसमोर सत्य येईल. सध्या काहीजण मला माझ्याच लोकांविरुद्ध उभे करत असल्याचे हसू येते, जे या जगातील अधिक चांगले आहे.”

गंभीरच्या याच प्रतिक्रियेवर काहींनी त्याने असे जगजाहीर नाही करायला पाहिजे. मैदानाच्या आत-बाहेर ज्या घटना घडत आहेत, तसेच सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चा या सर्वाकडे त्याने दुर्लक्ष केले पाहिजे असाही सल्ला दिला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात भारत ४८ धावांनी जिंकला. यामुळे पाच सामन्यांच्या या मालिकेत भारत १-० असा आघाडीवर आहे. याआधी भारत घरच्याच मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका गमावून बसला. तसेच मागील काही महिन्यांपासून गंभीर आणि रोहित शर्मा-विराट कोहली यांच्यात मतभेद असल्याची माहिती सोशल मीडियामार्फत समोर आली.

गंभीरने घरच्याच मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिका गमावल्या. तसेच त्याच्या प्रशिक्षणादरम्यान भारताने ऑस्ट्रेलियातही बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गमावली. यामुळे भारत पहिल्यांदाच कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत पोहोचला नव्हता.

कसोटीमधील भारताची कामगिरी आणि घरच्या मैदानावरील संघाचे वर्चस्व कमी होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे चाहते गंभीरवर चांगलेच नाराज आहे. आता त्याने सोशल मीडियावर वरील पोस्ट केल्याने त्यामध्ये भर पडली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---