न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा 8 विकेटने पराभव केला. अशाप्रकारे किवी संघ तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. आता उभय संघांमधील दुसरी कसोटी २४ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबरदरम्यान खेळवली जाणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, पुणे येथे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. यासाठी भारतीय संघ पुण्यात पोहोचला आहे. बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय संघाचे खेळाडू बंगळुरूहून पुण्यात कसे पोहोचले हे दाखवण्यात आले आहे.
बीसीसीआयच्या व्हिडिओमध्ये टीम इंडियाचे जवळपास सर्वच खेळाडू दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये विमान प्रवास ते पुणे विमानतळावर पोहोचेपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. तसेच भारतीय खेळाडूही त्यांचे अनुभव सांगत आहेत. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत.
पाहा व्हिडिओ-
Sound 🔛
Travel Day ✅#TeamIndia has reached Pune 👍#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/5CFAoK0dcJ
— BCCI (@BCCI) October 21, 2024
मागील सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय संघाला पहिल्या कसोटीत 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायला आलेल्या टीम इंडियाचा डाव अवघ्या 46 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने पहिल्या डावात 402 धावा केल्या. अशाप्रकारे न्यूझीलंडला पहिल्या डावाच्या आधारे 356 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी जोरदार पलटवार केला. पण पराभव टाळता आला नाही. सर्फराज खानने शतक झळकावले. तर रिषभ पंत 99 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. विराट कोहलीने 70 धावांचे योगदान दिले. भारतीय कर्णधार रोहित शर्माने 52 धावांची उपयुक्त खेळी केली. न्यूझीलंडसमोर विजयासाठी 106 धावांचे लक्ष्य होते. न्यूझीलंडने अवघ्या 2 गडी गमावून लक्ष्य गाठले.
हेही वाचा-
वडिलांची एक चूक, अन् जेमिमा रॉड्रिग्जचे सदस्यत्व रद्द! खार जिमखाना क्लबची मोठी कारवाई
मोठी बातमी..! “जास्त वजन आणि शिस्तभंग प्रकरणी” पृथ्वी शॉची मुंबई संघातून हकालपट्टी
खान कुटुंबीयांसाठी एका पाठोपाठ एक गूड न्यूज, ‘शतकावीर’नंतर सरफराज बनला पिता