भारतीय क्रिकेट संघ मुंबईत न्यूझीलंड विरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळणार आहे. हा सामन्याला 1 नोव्हेंबरपासून वानखेडे स्टेडियमवर सुरूवात होईल. टीम इंडियाने याआधीच मालिका गमावली आहे. बेंगळुरूनंतर न्यूझीलंडने पुण्यातील सामना जिंकून इतिहास रचला. भारताने 12 वर्षांनंतर घरच्या मैदानावर मालिका गमावली आहे. आता मुंबईत आणखी 12 वर्षांचा विक्रम तुटण्याची शक्यता आहे. पण हा विक्रम निरंतर ठेवण्यासाठी टीम इंडियाला कोणत्याही किंमतीवर विजय मिळवावा लागेल.
घरच्या मैदानावर मालिका व्हाईटवॉश टाळण्याचे आव्हान भारतीय संघासमोर आहे. तीन किंवा अधिक सामन्यांच्या मालिकेत घरच्या मैदानावर कोणताही संघ भारताचा व्हाईटवॉश करू शकलेला नाही. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दोन सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली होती. आता हा विक्रम आणखी 12 वर्षे कायम राखण्याचे आव्हान भारतासमोर आहे. मुंबईत टीम इंडियाची कामगिरी नेहमीच चांगली राहिली आहे आणि आता रोहित शर्माची सेना कशी कमबॅक करते हे पाहायचे आहे.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारताचा विक्रम मोठा आहे. पण तो तसा चांगला नाही. संघाने 1975 पासून येथे 26 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी 12 सामने जिंकले आहेत. तर भारतीयांनी सात सामने गमावले असून सात अनिर्णित राहिले आहेत. टीम इंडियाला गेल्या 5 सामन्यांमध्ये फक्त एकदाच पराभव पत्करावा लागला आहे. ज्यामध्ये शेवटचा पराभव 2012 मध्ये इंग्लंडविरुद्ध झाला होता. तेव्हापासून 12 वर्षांपासून भारत येथे अजिंक्य आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वानखेडे स्टेडियमवर शेवटची कसोटी डिसेंबर 2021 मध्ये खेळली गेली होती. ज्यामध्ये किवी संघाचा डावखुरा फिरकी गोलंदाज एजाज पटेलने एका डावात सर्व 10 विकेट्स घेतल्या. एका डावात 10 बळी घेणारा एजाज हा न्यूझीलंडचा पहिला आणि इतिहासातील तिसरा गोलंदाज ठरला. मात्र तया सामन्यात भारताने 372 धावांनी मोठा विजय नोंदवला.
वानखेडे स्टेडियमवर भारताचा विक्रम :
सामने: 26
विजय: 12
पराभव: 7
ड्राॅ: 7
हेही वाचा-
IND vs NZ; मुंबई कसोटीतून अनुभवी खेळाडू बाहेर, न्यूझीलंडला मोठा फटका
वनडे मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारे फलंदाज (टाॅप-5)
IND vs NZ: रोहित शर्माची प्रतीक्षा संपणार, 11 वर्षांनंतर हिटमॅन घरच्या मैदनावर परतणार