---Advertisement---

IND vs NZ: टीम इंडियाने जिंकली नाणेफेक! गिलने घेतला मोठा निर्णय, दीर्घ काळानंतर प्लेइंग 11 मध्ये दोन खेळाडू परतले

On: रविवार, जानेवारी 11, 2026 1:34 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना वडोदरा स्टेडियमवर खेळला जात आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर, टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिलने वेळ न घालवता प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. कर्णधार गिल पूर्ण तंदुरुस्ती मिळवल्यानंतर श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराजसह पुनरागमन करत आहे. गेल्या वर्षीच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी हे तिन्ही खेळाडू टीम इंडियाच्या संघाचा भाग नव्हते.

दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-

भारत – रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वाशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

न्यूझीलंड- डेव्हाॅन कॉनवे, हेनरी निकोल्स, विल यंग, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल हे (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), जैकरी फाउल्क्स, क्रिस्टियन क्लार्क, काइल जेमीसन, आदित्य अशोक

दाैऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास वनडे मालिकेमध्ये एकूण तीन सामने खेळले जाणार आहेत. ज्याचा पहिला वडोदरा येथे खेळला जात आहे. दुसरा सामना 14 जानेवारी तर तिसरा सामना 18 जानेवारी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जाईल. याशिवाय 5 सामन्यांची टी20 मालिका देखील खेळली जाईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---