न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला 8 विकेट्सने लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. भारताने न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांचे लक्ष्य दिले, ज्याचा किवी संघाने सहज पाठलाग केला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जे की चुकीचे सिद्ध झाले. भारतीय संघ पहिल्या डावात अवघ्या 46 धावांत सर्वबाद झाला होता. येथूनच टीम इंडिया या सामन्यात मागे पडली.
त्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात एकूण 402 धावा केल्या. किवी संघासाठी रचिन रवींद्र सर्वात मोठा हिरो ठरला. त्याने शतक झळकावले. त्याला डेव्हॉन कॉनवे आणि टीम साऊदी यांनी चांगली साथ दिली. या दोन्ही खेळाडूंनी अर्धशतके झळकावली. या खेळाडूंमुळेच न्यूझीलंड संघ चांगल्या स्थितीत पोहोचला. त्यानंतर भारताकडून कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी तीन बळी घेतले.
भारतीय संघाने दुसऱ्या डावात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. आघाडीचे सर्व फलंदाज लयीत दिसत होते. यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा यांनी संघाला शानदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. सर्फराज खानने दमदार शतक झळकावत 150 धावांची खेळी खेळली. त्याच्याशिवाय रिषभ पंतने दमदार फलंदाजी केली. त्याने 99 धावा केल्या. केएल राहुल पुन्हा एकदा फ्लॉप झाला. त्यानंतर भारतीय संघाला गळती लागली. भारतीय संघाने दुसऱ्या डावात 462 धावा केल्या. अशाप्रकारे टीम इंडियाने न्यूझीलंडला 107 धावांचे लक्ष्य दिले, ज्याचा पाठलाग त्याने सहज केला.
न्यूझीलंडचा भारतीय भूमीवरील कसोटीतील हा तिसरा विजय आहे. या कसोटीपूर्वी न्यूझीलंडने 36 वर्षांपूर्वी 1988 मध्ये भारतीय भूमीवर कसोटी सामना जिंकला होता. त्यानंतर आता न्यूझीलंडला विजय मिळाला आहे. कर्णधार रोहित शर्मा हा सामना हरताच त्याच्या नावावर एक लज्जास्पद विक्रम नोंदवला गेला आहे. तो तिसरा भारतीय कर्णधार बनला आहे. ज्याच्या नेतृत्वाखाली भारताने घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामना गमावला आहे. त्यामुळे दिलीप वेंगसरकर आणि मन्सूर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी सामना हरला आहे.
न्यूझीलंड संघाने भारतीय भूमीवर 38 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात तीन जिंकले आहेत आणि 17 कसोटी सामने गमावले आहेत. 17 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत.
मायदेशात न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव
1- 1969 मध्ये नागपूर कसोटीत 167 धावांनी पराभव
2- 1988 मध्ये मुंबई कसोटीत 136 धावांनी पराभव
3- 2024 मध्ये बेंगळुरू कसोटीत 8 गडी राखून पराभव
हेही वाचा-
झिम्बाब्वेचा भीमपराक्रम! भारताचा मोठा रेकॉर्ड अगदी थोडक्यात वाचला
न्यूझीलंडसमोर भारतानं गुडघे टेकले, बंगळुरू कसोटीत रोहित ब्रिगेडचा दारुण पराभव
निवडकर्ते लक्ष द्या…ऋतुराज गायकवाडनं ठोकलं आणखी एक शतक! आता तरी संधी मिळणार का?