न्यूझीलंडला भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात फिरकीला अनुकूल खेळपट्टीबद्दल पूर्वकल्पना टाळावी लागेल. भारताच्या गोलंदाजीच्या पर्यायांचा प्रभावी वापर करण्यावर भर द्यावा लागेल. असे न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने बुधवारी सामन्यापूर्वी बोलताना म्हणाला.
तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंड सध्या 1-0 ने आघाडीवर आहे. कारण पाहुण्या संघाने बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात 8 गडी राखून विजय मिळवला आहे. बेंगळुरू कसोटीत न्यूझीलंडने भारतीय संघाला पहिल्या डावात 46 धावांत गुंडाळले होते. भारताने दुसऱ्या डावातून पुनरागमन केल्याचे प्रयत्न केले असले तरी चौथ्या डावात न्यूझीलंडला केवळ 107 धावांचे लक्ष्य मिळाले. जे किवी संघाने सहज गाठले.
पुण्यात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला लॅथम म्हणाला, “आम्हाला परिस्थितीशी झटपट जुळवून घ्यावे लागेल. खेळपट्टीने चेंडूला अधिक वळण दिले तर, आमच्या पण संघात चार फिरकीपटू आहेत. मात्र, आम्ही पूर्वनिर्धारित मानसिकतेने सामन्यात जाणे टाळू इच्छितो.” न्यूझीलंडकडे इश सोढी, मिचेल सँटनर आणि एजाज पटेलसारखे अनुभवी फिरकीपटू आहेत. तसेच किवी संघाकडे रचिन रवींद्र आणि ग्लेन फिलिप्सच्या रूपाने तात्पुरत्या फिरकी गोलंदाजीचा पर्याय आहे.
तो म्हणाला, “खेळपट्टी कशी दिसेल याबद्दल मी स्पष्टपणे थोडा विचार केला आहे. आशा आहे की खेळपट्टी आमच्या सराव खेळपट्ट्यांसारखी असेल.” लॅथम म्हणाला की, न्यूझीलंडने बेंगळुरू कसोटीत भारताच्या विजयाची 36 वर्षांची प्रतीक्षा संपवल्याबद्दल आत्मसंतुष्ट होणार नाही. या विजयाबद्दल लॅथम म्हणाला, “हा विजय खूप खास आहे. ग्रॅहम डॉलिंग आणि जॉन राईटसारख्या कर्णधारांच्या यादीत स्वतःला पाहणे विशेष आहे. मात्र, माझ्यासाठी हा विजय सांघिक प्रयत्न होता.”
हेही वाचा-
श्रीलंकेची रेकाॅर्डब्रेक कामगिरी, टी20 पाठोपाठ वनडे मध्येही वेस्ट इंडिजला लोळवले
मोहम्मद शमीचं पुनरागमन लांबणीवर? ‘ब्रेट ली’नं या युवा गोलंदाजाला BGT खेळण्याचा दिला सल्ला
पुण्याच्या एमसीएवर किंग कोहलीची विराट कामगिरी, पाहा आकडेवारी






