भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथे होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी येथे भरपूर पाऊस झाला आहे. मीडियारिपोर्ट्सनुसार, सामन्यादरम्यानही पाऊस पडू शकतो. असे झाल्यास चाहत्यांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पावसामुळे सामन्याला उशिर झाले आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना आज बुधवारी बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे.
हवामान वेबसाइटनुसार, बंगळुरूमध्ये सकाळी 9 वाजता पावसाची 24 टक्के शक्यता आहे. भारत-न्यूझीलंड कसोटीसाठी नाणेफेक सकाळी 9 वाजता होणार होते. पण पावसामुळे टाॅसला विलंब झाला. आता देखील पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. सकाळी 10.30 वाजता 43 टक्के आणि 11.30 वाजता 80 टक्के पावसाची शक्यता आहे. हा ट्रेंड पुढेही चालू राहू शकतो. असे झाल्यास सामना लांबणीवर पडू शकतो.
सामन्यापूर्वी खेळपट्टी झाकण्यात आली आहे. यासोबतच मैदानाच्या काही भागावर आच्छादनही टाकण्यात आले आहे. भारत-न्यूझीलंड कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रावर पावसाचा परिणाम नक्कीच होणार आहे. यासोबतच पावसामुळे दुसऱ्या सत्रातही व्यत्यय येऊ शकतो.
एम. चिन्नास्वामी स्टेडियमची ड्रेनेज व्यवस्था चांगली आहे. स्टारस्पोर्टच्या एका बातमीनुसार, पावसानंतर हे मैदान अवघ्या 15 मिनिटांत खेळण्यायोग्य बनवता येईल. पाऊस कितीही मुसळधार असला तरी कमी वेळात खेळासाठी तयार होऊ शकतो. हे मैदान 2017 मध्ये नव्याने तयार करण्यात आले. सब-सर्फेस एरेशन आणि व्हॅक्यूम पॉवर्ड ड्रेनेज सिस्टिमचा वापर येथे करण्यात आला आहे.
हेही वाचा-
बीसीसीआय कर्णधाराला हटवण्याच्या तयारीत! भारताच्या खराब कामगिरीमुळे निर्णय?
‘दोघांची नावे…’- विराट कोहली-बाबर आझमच्या तुलनेवर भारतीय दिग्गज संतापला!
टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील सर्व संघ निश्चित, जाणून घ्या सुपर-4 चे संपूर्ण वेळापत्रक