भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली बऱ्याच दिवसांनी आजच्या सामन्यात फाॅर्म मध्ये दिसला. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या कोहलीने दुसऱ्या डावात दमदार अर्धशतक झळकावले. मात्र, त्याला त्याचे शतकात रूपांतर करता आले नाही. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अखेरच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर तो पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, अंपायरने आऊट दिल्यानंतरही कोहलीला तो झेलबाद झाल्याची खात्री नव्हती. त्यामुळे त्याने रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला. पण अल्ट्रा एजमध्ये चेंडू बॅटच्या काठावर गेल्याचे स्पष्टपणे दिसले आणि अशा प्रकारे विराट कोहली झेलबाद झाला.
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात विराट कोहलीची सुरुवात संथ होती. त्याने 15 व्या चेंडूवर पहिली धाव घेतली. मात्र, त्यानंतर त्याने सर्फराज खानसोबत तिसऱ्या विकेटसाठी 136 धावांची भागीदारी केली. ज्यामुळे भारत सामन्यात पुनरागमन करण्याच्या जवळ आला. मात्र, दिवसाच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कोहली विकेटच्या मागे झेलबाद झाला. अंपायरने थोडा वेळ घेतला. शेवटी मग बोट वर केले. पण कोहलीला खात्री होती की तो नाबाद आहे. त्याने लगेच रिव्ह्यू घेतला पण चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. विराट कोहली 102 चेंडूत 70 धावा करून बाद झाला. आपल्या खेळीत त्याने 8 चौकार आणि एक षटकार लगावला.
भारताने पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात तीन गड्यांच्या मोबदल्यात 231 धावा करून सामन्यात चांगले पुनरागमन केले. पहिल्या डावात 356 धावांनी पिछाडीवर पडलेला भारतीय संघ आजही न्यूझीलंडपेक्षा 125 धावांनी पिछाडीवर असून दिवसअखेर भारताचा सर्फराज 70 धावांवर खेळत होता. तर कोहली बाद झाला. न्यूझीलंडकडून एजाज पटेलने दोन बळी घेतले. त्याने कर्णधार रोहित शर्मा (52) आणि यशस्वी जयस्वाल (35) यांना बाद केले.
हेही वाचा-
टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! रिषभ पंतच्या दुखापतीबाबत मोठे अपडेट समोर
ind vs nz; भारताचा पलटवार, रोहित-विराटसह, सर्फराजची शानदार खेळी, असा राहिला तिसरा दिवस
कोहलीची ‘विराट’ कामगिरी, सचिन-द्रविड आणि गावस्कर यांच्या खास क्लबमध्ये प्रवेश