भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाचा पराभव केला होता. भारतीय संघाच्या पराभवामुळे कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग 11 मध्ये काही बदल केले आणि वॉशिंग्टन सुंदरला (washington sundar) संधी मिळाली. सुंदरने या संधीचा पुरेपूर फायदा घेत 7 बळी घेतले. या सामन्यात सुंदरने अप्रतिम गोलंदाजी केली आहे. पहिला दिवस संपताच सुंदरने आपल्या प्लॅनबद्दल खुलासा केला आहे. या सामन्यातील त्याची आवडती विकेट कोणती होती हेही त्याने सांगितले.
वॉशिंग्टन सुंदर या सामन्यात अगदी खास प्लॅनसह उतरला होता. तब्बल1329 दिवसांनंतर टीम इंडियासाठी कसोटी सामना खेळत असलेल्या सुंदरने पहिल्या दिवसाच्या खेळानंतर बोलताना, आपल्याला दिलेल्या संधीसाठी प्रशिक्षक आणि कर्णधार रोहित शर्माचे आभार मानले. त्याने आपल्या प्लॅनबद्दलही सांगितले. तो म्हणाला, “या सामन्यात मला खूप अचूक गोलंदाजी करायची होती. त्यामुळे मी कोणत्या स्थितीत गोलंदाजी करत आहे किंवा कोणत्या फलंदाजाचा सामना करत आहे, याचा विचार मी केला नव्हता. ही देवाची योजना होती, ती प्रत्यक्षात उतरली.”
तो पुढे म्हणाला की, “मी फक्त विशिष्ट जागेवर मारा करण्यावर लक्ष केंद्रित केले. केवळ चेंडूचा वेग थोडाफार बदलत होतो.” खेळपट्टीबाबत तो म्हणाला की, “पहिल्या दिवसापासून फिरकीला सुरुवात होईल, असे वाटतच होते. पहिल्या सत्रात चेंडू फिरला पण दुसऱ्या सत्रात खेळपट्टीने फारशी मदत केली नाही. तिसऱ्या सत्रात खेळपट्टीत काहीच उरले नव्हते.” या सामन्यात त्याला कोणत्या खेळाडूची विकेट आवडली असे विचारले असता त्याने सांगितले की, त्याच्यासाठी एक निवडणे कठीण आहे. मात्र डॅरिल मिशेलची विकेट गेमचेंजर ठरली.
महत्त्वाच्या बातम्या-
सरफराज खानने आक्रमकपणे कर्णधार रोहितला डीआरएस घेण्यासाठी मनवले आणि नंतर… Video
गंभीर-रोहितमध्ये कॉमनसेन्स नाही, माजी खेळाडूचं धक्कादायक वक्तव्य
IND vs NZ; ‘या’ स्टार खेळाडूचा जलवा पाहून गावसकरांनी फिरवले शब्द, म्हणाले…