---Advertisement---

IND vs PAK । राहुलपाठोपाठ विराटनेही दाखवला क्लास! अवघ्या ‘इतक्या’ चेंडूत पूर्ण केलं अर्धशतक

On: सोमवार, सप्टेंबर 11, 2023 5:55 PM
Virat Kohli
---Advertisement---

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर पोरचा सामना रविवारी (10 सप्टेंबर) सुरू झाला. हा सामना पावसामुळे रविवारी पूर्ण होऊ शकला नाही. सोमवारी म्हणजेच रिझर्व्ह डे दिवशी विराट कोहली आणि केएल राहुल यांनी भारतासाठी डावाची सुरुवात केली. विराटने आपल्या काकिर्दीतील 65 वे अर्धशतक सोमवारी (11 सप्टेंबर) पूर्ण केले.

रविवारी भारताची धावसंख्या 24.1 षटकात 2 बाद 147 धावा होती. विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुल (KL Rahul) अनुक्रमे 8* आणि 17* धावांसह खेळपट्टीवर कायम होते. या दोघांनीही सोमवारी देखील संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली. राहुलने 60 चेंडूत अर्धशतक केल्यानंतर विराटने देखील 55 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. राहुल आणि विराटमध्ये यादरम्यन 100 धावांची भागीदारी देखील पार पडली. (IND vs PAK । FIFTY FOR KING KOHLI!)

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पंड्या, ईशान किशन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज

पाकिस्तान – फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहिम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ व नसीम शाह.

महत्वाच्या बातम्या –  
जुगाडू ग्राऊंड स्टाफ! हिटिंग लाईट्सने कोरडी केली खेळपट्टी, भारत-पाक सामन्याला अखेर सुरुवात
“विराट माझ्या स्वप्नात येतो”, पाकिस्तानी दिग्गजाने केला मोठा खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---