भारतीय संघाने रविवारी (28 ऑगस्ट) रोजी आशिया चषकातील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. जयप्रीत बुमराह आशिया चषकात खेळत नसला, तरी भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात चमकदार कामगिरी करून दाखवली. भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग यांनी शेवटच्या षटकांमध्ये महत्वाच्या विकेट्स घेतल्यामुळे पाकिस्तानला अपेक्षित धावसंख्या गाठता आली नाही.
भुवनेश्वर कुमार (Bhuvaneshear Kumar) याने १७ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर आसिफ अली याला सूर्यकुमार यादवच्या हातात झेलबाद केले. आसिफ अलीने या सामन्यात ७ चेंडूत ९ धावा केल्या. त्यानंतर १८ व्या षटकातील पहिल्यांच चेंडूवर अर्शदीपनेही महत्वाच्या विकेट घेतली. अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याच्या चेंडूवर मोहम्मद नवाज (Mohammad Nawaz) अवघी एक धाव करून यष्टीरक्षक दिनेश कार्तिकच्या हातात झेलबाद झाला.
ASIA CUP 2022. WICKET! 16.3: Asif Ali 9(7) ct Suryakumar Yadav b Bhuvneshwar Kumar, Pakistan 112/6 https://t.co/00ZHI9OyYt #INDvPAK #AsiaCup2022
— BCCI (@BCCI) August 28, 2022
ASIA CUP 2022. WICKET! 17.1: Mohammad Nawaz 1(3) ct Dinesh Karthik b Arshdeep Singh, Pakistan 114/7 https://t.co/00ZHI9O18V #INDvPAK #AsiaCup2022
— BCCI (@BCCI) August 28, 2022
पाकिस्तानच्या डावातील १९ व्या षटकात भुवनेश्वर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आला. या षटकात त्याने दुसऱ्या चेंडूवर भुवनेश्वरने दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर लागोपाठ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या चेंडूवर शादाब खान (Shadab Khan) १० धावा करून एलबीडब्ल्यू झाला. तर षटकातील तिसऱ्या चेंडूवर नसीम शाह याने शून्य धावांवर विकेट गमावली.
ASIA CUP 2022. WICKET! 18.2: Shadab Khan 10(9) lbw Bhuvneshwar Kumar, Pakistan 128/8 https://t.co/00ZHI9O18V #INDvPAK #AsiaCup2022
— BCCI (@BCCI) August 28, 2022
ASIA CUP 2022. WICKET! 18.3: Naseem Shah 0(1) lbw Bhuvneshwar Kumar, Pakistan 128/9 https://t.co/00ZHI9OyYt #INDvPAK #AsiaCup2022
— BCCI (@BCCI) August 28, 2022
भुवनेश्वर आणि अर्शदीप यांच्याव्यतिरिक्त हार्दिक पंड्याने देखील तीन महत्वाच्या विकेट्स नावावर केल्या. भारतीय गोलंदाजांच्या या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तान संघा दुबळा दिसून आला. पाकिस्तानने १९.५ षटकात १४७ धावा केल्या आणि संघ सर्वबाद झाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुबईच्या मैदानावर पाऊल ठेवताच सचिनला मागे सोडत रोहित बनला ‘अव्वल नंबरी’
हार्दिकने एकाच ओव्हरमध्ये पाकिस्तानला दिला ‘डबलडोस!’ रिजवान अन् खुशदील एकामागे एक बाद
हार्दिकच्या बाऊंसरपुढे इफ्तिकारने टेकले गुडघे! कार्तिकच्या जबरदस्त झेलच्या जोरावर भारताला मिळाली तिसरी विकेट