एशिया कप (Asia Cup) २०२२ स्पर्धा सुरू होण्यासाठी आता फक्त काहीच तास शिल्लक आहेत. २७ ऑगस्टपासून सुरू होणारी ही स्पर्धा युनायटेड अरब अमिराती (यूएई) येथे खेळली जाणार आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध (INDvsPAK) आहे. हा सामना येत्या रविवारी (२८ ऑगस्ट) दुबई येथे खेळला जाणार आहे. हातात फारच कमी वेळ बाकी असताना भारतीय संघाची डोकेदुखी वाढली आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी अंतिम अकरामध्ये दोन खेळाडूंवरून पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
भारतीय संघ या स्पर्धेत रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. तर निवडकर्त्यांनी निवडलेल्या १५ जणांच्या संघामध्ये दीपक हुड्डा (Deepak Hooda) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यांचा समावेश आहे. तर या दोघांपैकी कोणाला पाकिस्तान विरुद्ध खेळवावे हा निर्णय घेणे कठीण आहे. तर रोहित आणि मुख्य प्रशिक्षक वीवीएस लक्ष्मण हेच अंतिम निर्णय घेणार आहेत.
हुड्डा आणि कार्तिक दोघेही प्रतिभावंत आणि जबरदस्त खेळाडू आहेत. यामुळे या दोघांपैकी कोणाला संघात घ्यावे यावरून संघासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. हुड्डा हा एक असा खेळाडू आहे ज्याने पदार्पण करताच अनेक सामन्यांमध्ये अष्टपैलू कामगिरी केली आहे. तसेच जेव्हा जेव्हा त्याला संघात घेतले आहे त्याने कधीही निराशा केलेली नाही. त्याचबरोबर त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये एक शतक आहे. यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
हुड्डाबरोबरच कार्तिकनेही मागील काही सामन्यांमध्ये भारतासाठी विशेष खेळी केली आहे. त्याने योग्य फिनीशरची भुमिका निभावली आहे. त्याने उत्तम खेळी करत अनेक सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे. तसेच सद्यस्थितीत त्याच्याकडे सामना जिंकून देण्याची क्षमता आहे.
टी२० प्रकारच्या खेळामध्ये कार्तिकसारख्या एका उत्कृष्ठ फिनीशरची संघाला आवश्यकता असते. त्याने इंडियन प्रीमियर लीग २०२२च्या (आयपीएल) हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत धावांचा पाऊस पाडला होता. त्याची हीच कामगिरी पाहून त्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले.
एशिया कपसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, आवेश खान.
राखीव खेळाडू- दीपक चाहर, श्रेयस अय्यर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कहानी में ट्वीस्ट! चाहरची दुखापत आहे ‘खोटी’, तर राजस्थान रॉयल्सचा कुलदीप सेन ‘या’ भूमिकेत
IND-PAK सामन्याची क्रेझ! तब्बल १३२ देशांमध्ये एशिया कपचे लाईव्ह स्ट्रिमींग, भारतात ‘या’ चॅनेलवर पाहाल
नवी जर्सी समोर आली रे..! एशिया कपसाठी अशी आहे भारताची जर्सी, लोगोवरील ३ स्टार्सचे खास महत्त्व