---Advertisement---

अरर! पाकिस्तानच्या राष्ट्रगीताऐवजी डीजेने वाजवलं गाणं; खेळाडूं बुचकळ्यात, VIDEO VIRAL

On: सोमवार, सप्टेंबर 15, 2025 7:03 AM
---Advertisement---

दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर रविवारी भारत–पाकिस्तान यांच्यात झालेल्या हाय व्होल्टेज सामन्यात टीम इंडियाने 7 गडी राखून सहज विजय मिळवला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आणि 128 धावांचे लक्ष्य भारतासमोर ठेवले होते. हे लक्ष्य भारतीय फलंदाजांनी आरामात पूर्ण केले.

सामन्यापूर्वी मात्र एक मजेशीर प्रसंग घडला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की पाकिस्तानच्या राष्ट्रगीताऐवजी डीजेने चुकून पॉप सॉन्ग ‘जलेबी बेबी’ वाजवला. अचानक हे गाणं ऐकून पाकिस्तानी खेळाडू बुचकळ्यात पडले आणि इकडे-तिकडे पाहू लागले. काही क्षणांतच डीजेने चूक सुधारली व पाकिस्तानचे राष्ट्रगीत लावले. हा व्हिडिओ नेटिझन्सनी प्रचंड शेअर करत पाकिस्तानची खिल्ली उडवली.

या सामन्यातील आणखी एक मुद्दा चर्चेत राहिला तो म्हणजे टॉसवेळी हात न मिळवणे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानी कर्णधार सलमान आगा यांनी एकमेकांशी हात मिळवला नाही. साधारणतः आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टॉसदरम्यान दोन्ही संघांचे कर्णधार हस्तांदोलन करतात, पण ते अनिवार्य नसते. दोघांनी एकमेकांकडे पाहिलेसुद्धा नाही. त्यांनी थेट सामना रेफरी अँडी पाइक्रीफ्ट यांच्याकडे संघाची यादी दिली आणि आपापल्या दिशेने निघून गेले.

बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, ‘‘प्रत्येक स्पर्धेचे स्वतःचे काही प्रोटोकॉल असतात. काही ठिकाणी टॉसवेळी हस्तांदोलन करणे बंधनकारक असते, पण येथे तसे नव्हते. सूर्यकुमार यादवने याआधी यूएईविरुद्धच्या सामन्यातही टॉसवेळी हात मिळवलेला नव्हता.’’

गेल्या महिन्यात भारताने नवी क्रीडा धोरण जाहीर केली आहे. त्यानुसार, भारत–पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका बंदीत राहतील; मात्र बहुपक्षीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये (जसे की आशिया कप, वर्ल्ड कप) हे दोन प्रतिस्पर्धी संघ आमनेसामने खेळू शकतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---