भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटलं की शाब्दिक वाद हा आलाच. असेच काहीसे 2015 सालच्या विश्वचषकामध्ये झालेल्या पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामन्यामध्ये घडले. पाकिस्तान संघाचा क्रिकेटपटू सोहेल खान याने भारतीय खेळाडूबद्दल वादग्रस्त विधान केले होते. सोहेलने तब्बल 8 वर्षांनी एका मुलाखतीत याविषयी खुलासा केला. त्यामुळे हा सामना चर्चेचा विषय ठरला. चला तर जाणून घेऊया की, नेमका काय आहे विषय…
सन 2015च्या वनडे विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या (Ind vs Pak) सामन्यादरम्यान, पाकिस्तान संघाचा क्रिकेटपटू सोहेल खान (Pakistani cricketer Sohel Khan) व भारतीय विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. एका पॉडकास्ट मुलाखती दरम्यान सोहेलने त्याची आठवण करून दिली. यात तो म्हणाला की, विराट त्याला एक नवीन खेळाडू समजत होता. त्यामुळे त्याने भारतीय फलंदाजाला आठवण करून दिली की, त्याने त्याच्या आधी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती.
सोहेल खान (Sohel Khan) एका शोमध्ये म्हणाला, “भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी मी मीडियासमोर म्हटलं होतं की, एमएस धोनी (MS Dhoni), विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Shrama) ही किती मोठी नावे आहेत, मला माहिती नाही. मी म्हणालो, मी सर्व फलंदाजांना बाद करीन. मी टॉप ऑर्डरमधील पाचही खेळाडू बाद केले. मी फलंदाजीसाठी आलो, तेव्हा कोहली माझ्याकडे आला आणि म्हणू लागला की, फक्त आठ दिवसच झाले आणि तुम्ही इतके बोलत आहात. त्यावेळी सोहेल म्हणाला की, “जेव्हा तु भारत अंडर-19 खेळत होता, तेव्हा तुझा बाप कसोटी क्रिकेट खेळत होता.”
सन 2015 च्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाने 7 विकेट्सवर 300 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने 224 धावा केल्या. मात्र, 76 धावांनी संघाला पराभव पत्कारावा लागला. विशेष म्हणजे, या सामन्यात विराटने 107 धावा केल्या. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. विराटला त्यावेळी धोनीने शांत केले. परंतु त्याने चांगली कामगिरी करुन सर्वांची बोलती बंद केली. (Ind vs Pak one day world cup 2015 pakistani cricketer Sohel Khan disclose truth about indian cricketer Virat Kohli)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच देशात नाकी नऊ आणणारे जबरदस्त गोलंदाज, यादीत ‘हा’ एकमेव भारतीय
असे 7 क्रिकेटपटू ज्यांचे षटकार चिरकाल राहतील आठवणीत! नेमके कोण आहेत हे खेळाडू