क्रिकेटमध्ये जेव्हा-जेव्हा भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होतो, तेव्हा-तेव्हा चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असते. आजही असंच काहीसं पाहायला मिळणार आहे. 2024 महिला आशिया कपमध्ये आज भारत आणि पाकिस्तानचे संघ आमने-सामने आहेत. हा सामना कधी, कुठे आणि कसा थेट पाहू शकता हे या बातमीद्वारे जाणून घेऊया.
2024 महिला आशिया चषक स्पर्धेत आज (19 जुलै) भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी20 सामना रंगणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना नेपाळ आणि यूएईच्या महिला संघांमध्ये होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना भारत आणि पाकिस्तानच्या महिला संघांमध्ये होईल. श्रीलंकेकडे महिला आशिया चषक स्पर्धेचं यजमानपद आहे. स्पर्धेतील सर्व सामने डंबुला येथील रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळले जातील.
भारत-पाकिस्तान सामना कधी खेळला जाणार? – 2024 महिला आशिया चषक स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना शुक्रवार, 19 जुलै रोजी खेळला जाणार आहे.
सामना किती वाजता सुरू होईल? – भारत आणि पाकिस्तान महिला संघातील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.
सामना कुठे होणार आहे? – हा सामना श्रीलंकेच्या रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे.
सामना कोणत्या टीव्हीवर कोणत्या चॅनलवर पाहता येईल? – तुम्ही भारत आणि पाकिस्तान महिला संघातील सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता.
मोबाईलवर हा सामना कसा पाहायचा? – तुम्ही ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’ ॲपवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना थेट पाहू शकता.
टीम इंडियाचं वेळापत्रक – महिला आशिया चषक 2024 मध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे, जो शुक्रवार, 19 जुलै रोजी खेळला जाील. त्यानंतर भारतीय संघचा दुसरा सामना रविवारी, 21 जुलै रोजी यूएईशी होईल. यानंतर, टीम इंडियाचा ग्रुप स्टेजमधील तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी, 23 जुलै रोजी नेपाळशी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
या 3 कारणांमुळे झाली रियान परागची भारतीय संघात निवड, झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत ठरला होता फ्लॉप
संपुर्ण यादीः घटस्फोट घेतलेले 9 दिग्गज भारतीय क्रिकेटर्स, एकाने तर…
टीम इंडियाची घोषणा: गौतम गंभीरचा मास्टर प्लॅन? धोनीच्या विश्वासू खेळाडूला संघातून वगळलं!